पनवेल पालिकेच्या स्थापनेच्या ६ वर्षानंतर शासनाने पालिकेच्या स्वतंत्र पशुधन विकास अधिकारी या पदावर डॉक्टर नेमले आहेत. डॉ. बी. एन. गिते यांची या पदावर नियुक्ती झाली आहे. डॉ. गिते यांनी लवकरच पालिकेमध्ये भटक्या मृत प्राण्यांसाठी शवदाहिनीच्या उभारणीसाठी रायगड जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पत्रव्यवहार सूरु केला आहे. शवदाहिनीसाठी पालिका भूखंड शोधत असल्याचे डॉ. गिते यांनी पनवेलच्या पर्यावरण व प्राणी मित्रांना दिलेल्या लेखी उत्तरात म्हटले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा- शिवसेनेचा दसरा मेळावा शिवाजी पार्कवरच; उच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर नवी मुंबईत शिवसैनिकांचा जल्लोष

पनवेलमध्ये भटक्या प्राण्यांची संख्या अधिक

पनवेल महापालिकेच्या परिसरात सिडको महामंडळाने वसविलेले नियोजनबद्ध वसाहती असल्याने या पालिकेला स्मार्ट शहराचा दर्जा मिळत आहे. मात्र या शहरांमध्ये नागरीकांसाठी सोयीसुविधा उपलब्ध असल्या तरी भटक्या व पाळीव श्वानांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. पालिकेने पाळीव श्वानांचा अद्याप शहरात सर्वेक्षण केले नाही. पाळीव श्वानांचे परवाने अद्याप मालमत्ता धारकांना पालिकेने दिले नाहीत. यापूर्वी पनवेल पालिकेच्या सदस्यमंडळाने सर्वसाधारण सभेत याबाबत निर्णय न घेतल्याने नवीन निवडूण येणा-या पालिका सदस्यांना श्वान परवाना देण्याविषयी आणि त्याच्या शुल्काची रकमेविषयी निर्णय घेऊ शकतील.

हेही वाचा- पनवेलमधील तृतीयपंथींना मिळणार हक्काचे घर; पालिकेच्या प्रधानमंत्री आवास योजनेत ५० घरे राखीव

प्राणी मित्रांची पनवेल पालिकेकडे शवदाहिनीची मागणी

पालिकेत प्राण्यांसाठी शवदाहिनी सारखी सुविधा नसल्याने अनेक प्राणी मित्रांनी पनवेल पालिकेकडे शवदाहिनीची मागणी केली होती. मात्र या मागणीकडे दुर्लक्ष केले जात असल्याने कामोठे येथील सामाजिक कार्यकर्त्या रंजना सडोलीकर यांनी प्रधानमंत्री कार्यालयात याबाबत मागणी केली. त्यानंतर सडोलीकर यांच्या पत्रव्यवहाराची दखल पनवेल पालिकेने घेऊन या सामाजिक प्रश्नावर उत्तर दिले आहे. सडोलीकर यांनी प्राण्यांसाठी शवदाहिनीसोबत पशू वैद्यकीय दवाखाना पालिकेने कुठे व कधी सूरु कऱणार असा प्रश्न विचारला होता. याबद्दल पालिकेचे पशुधन विकास अधिकारी डॉ. गिते यांनी याबाबत रायगड जिल्हाधिका-यांकडे मागणी केली असल्याचे उत्तर दिले असून पालिका क्षेत्रात पनवेल शहरातील पंचायत समिती कार्यालयाच्या परिसरात लघुपशू चिकित्सालय असल्याची माहिती दिली आहे. पालिका क्षेत्रात भटक्या श्वानांसाठी निर्भिजीकरणाचे काम सूरु असून सरासरी दीडशे श्वानांवर महिन्याला निर्भिजीकरणाची शस्त्रक्रीया केली जात असल्याची माहिती पशुधन विकास अधिकारी डॉ. गिते यांनी दिली.

Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Need for land for cremation of animals in panvel letter from municipal livestock development officer to raigad district collector dpj