जगदीश तांडेल, लोकसत्ता

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

उरण : राज्यातील औद्याोगिक व वाढत्या नागरीकरणाचा तालुका असलेल्या उरणच्या नव्या तहसील कार्यालयाच्या इमारतीसाठी ५३ कोटींच्या निधीची मागणी शासनाकडे करण्यात आली आहे. त्यामुळे लवकरच उरणमध्ये सर्व सुविधांनी युक्त असे तहसील कार्यालय उभे राहणार आहे. ज्याची उरणच्या नागरिकांना अनेक वर्षांपासून प्रतीक्षा आहे.

मुंबईसारख्या जागतिक शहरानजीक असलेल्या उरणमध्ये केंद्र व राज्य सरकारचे मोठमोठे प्रकल्प आहेत. त्यामुळे राज्यातील औद्याोगिक क्षेत्रात तालुका अग्रगण्य आहे. तर सिडको आणि येऊ घातलेल्या नैना व एमएमआरडीएच्या प्रस्तावित शहराने येथील लोकसंख्याही वाढणार आहे. येथील नागरिकांना लागणाऱ्या विविध प्रकारच्या सुविधा, प्रमाणपत्रे तसेच इतर महसुली कामे पार पाडण्यासाठी मोठ्या जागेची आवश्यकता आहे. त्यासाठी उरणच्या नव्या तहसील कार्यालयासाठी सुसज्ज इमारतीची मागणी करण्यात आली आहे.

आणखी वाचा-उरण : जागतिक पर्यटनस्थळ घारापुरी टंचाईग्रस्त, बेटावर बोटीने पाणीपुरवठ्याची मागणी

उरणच्या औद्याोगिक व नागरी विकासामुळे शासनाला सर्वात अधिक वार्षिक महसूल देणारा उरण हा तालुका आहे. या तालुक्यात सुसज्ज तहसील कार्यालय उभे राहावे ही येथील नागरिकांची मागणी आहे. उरणच्या नव्या तहसील कार्यालयाच्या इमारतीसाठी शासनाकडे ५३ कोटींच्या निधीची मागणी केली आहे. त्याचा प्रस्ताव पाठविला आहे. कुंभारवाडा परिसरातील शासकीय रुग्णालयानजीकच्या भूखंडावर हे कार्यालय उभारण्यात येणार असल्याची माहिती उरणचे तहसीलदार डॉ. उद्धव कदम यांनी दिली आहे.

Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Proposal for a new tehsildar office of uran demand for funds of 53 crores from the government mrj