लोकसत्ता प्रतिनिधी,

उरण : रविवारी शरद पवार यांनी उरणमध्ये पक्षाचे प्रदेश सरचिरणीस दिवंगत प्रशांत पाटील यांच्या कुटुंबियांचे त्यांच्या उरण येथील घरी भेट देत सांत्वन केले. प्रशांत पाटील हे शरद पवार यांचे निकटवर्तीय होते. त्यांच्या निधनानंतर पवार यांनी ही भेट घेतली. यावेळी बोलताना शरद पवार यांनी प्रशांत पाटील हे प्रामाणिक व एकनिष्ठ कार्यकर्ते होते. पक्षाला तळागाळात पोहोचविण्याचे काम त्यांनी केले असून पक्षासाठी रात्रंदिवस झटणारा कार्यकता पक्षातून गेला त्यामुळे पक्षाला मोठा धक्का बसला असल्याचे ते म्हणाले.

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे प्रदेश सरचिणीस प्रशांत पाटील यांचे २० जून २०२४ रोजी आकस्मिक निधन झाले होते. त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी शरदचंद्र पवार व त्यांच्या पत्नी प्रतिभा पवार यांनी उरण शहरातील कामठा येथील दिवंगत प्रशांत पाटील यांच्या निवासस्थानी भेट घेऊन त्यांच्या कुटुंबीयांचे सांत्वन केले.

आणखी वाचा-नवी मुंबई पोलीस भरतीमध्ये काँक्रीटच्या रस्त्यावर धावणीची परिक्षा

यावेळी माजी आ. मनोहर भोईर, जेएनपीए विश्वस्त दिनेश पाटील, शेकाप तालुका चिटणीस विकास नाईक,राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला सरचिटणीस भावना घाणेकर,यांच्यासह प्रशांत पाटील यांच्या पत्नी,मूले व भाऊ नातेवाईक,मित्र परिवार तसेच विविध राजकीय पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.