Premium

आरोग्यव्यवस्था बंद, मात्र करोना रुग्णवाढ ; आठवडाभरात दैनंदिन रुग्णसंख्येत दुपटीने वाढ

वाढत्या रुग्णसंख्येमुळे केंद्राने राज्यांना सतर्कतेच्या सूचना जारी केल्या असून नवी मुंबई महापालिका प्रशासनही सतर्क झाले आहे.

corona
संग्रहित छायाचित्र

नवी मुंबई : शहरातील दैनंदिन करोना रुग्णसंख्या घटल्याने पालिका प्रशासनाने आरोग्यव्यवस्था बंद करीत मनुष्यबळही कमी केले असताना आता शहरात पुन्हा करोना रुग्ण वाढू लागले आहेत. १ ऑगस्ट रोजी दैनंदिन रुग्णसंख्या ३२ होती. दोन दिवसांत त्यात दुपटीने वाढ होत ती ७० च्या पुढे गेली आहे. ठाणे जिल्ह्यात नवी मुंबईत सर्वाधिक रुग्ण आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

वाढत्या रुग्णसंख्येमुळे केंद्राने राज्यांना सतर्कतेच्या सूचना जारी केल्या असून नवी मुंबई महापालिका प्रशासनही सतर्क झाले आहे.नवी मुंबई शहरामध्ये करोनाचे नवे रुग्ण तसेच उपचार घेत असलेली रुग्णसंख्याही गेली काही दिवस स्थिर होती. दैनंदिन रुग्ण ५० पेक्षा कमी होते, तर पालिकेच्या एकमेव वाशी प्रदर्शनी केंद्रातील करोना रुग्णालयात एकमेव रुग्ण होता. सर्व रुग्ण घरीच उपचार घेत होते. त्यामुळे पालिका प्रशासनाने आपली सर्व काळजी केंद्रे बंद करीत सिडको प्रदर्शनी केंद्रातील बाराशे खाटांचे रुग्णालयही बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. येथील फक्त अत्यावश्यक सेवा सुरू ठेवण्यात आली आहे. याबरोबरच प्रशासनाने मनुष्यबळही कमी केले आहे.

Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: The health system is closed but the number of corona patients is increasing amy

First published on: 10-08-2022 at 00:02 IST
Next Story
वादळीवाऱ्यामुळे जलवाहतूक बंद ; चाकरमान्यांचे हाल