सानपाडा पोलीस ठाण्यात विनयभंग केल्याची तक्रार नोंदवण्यास आलेल्या युवतीची तक्रार न घेणाऱ्या पोलीस उपनिरीक्षकावरही निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. याच पोलीस ठाण्यात कार्यरत असलेला पोलीस नाईक दिपक राठोड याला यापूर्वीच अटक करण्यात आले आहे. या कारवाईने नवी मुंबई पोलिसांची प्रतिमा थोडी तरी उजळ होईल, अशी चर्चा प्रामाणिक पोलीस अधिकारी कर्मचार्यात सुरु आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा- यंदा ड्रंक अ‍ॅण्ड ड्राईव्हमध्ये अडकले १६० वाहनचालक; गेल्या वर्षीच्या तुलनेत चौपट वाढ

पवई आयटीआयमध्ये शिकणारी एक युवती  मित्राला भेटण्यास नवी मुंबईतील सानपाडा येथे शुक्रवारी आली होती. त्यानंतर दोघेही निवांतपणे भुमीराज कोस्टारिका सोसायटी समोर फिरत असताना गुन्हयातील आरोपी पोलीस शिपाई दिपक राठोड हा सदर ठिकाणी जाऊन फिर्यादी यांना ऐवढया रात्री या ठिकाणी का फिरता? असा जाब विचारला. युवक युवतीने त्यांना माहिती दिली. मात्र, पोलीस नाईक राठोड याने मोबाईल क्रमांक मागितला. मोबाईल क्रमांक देण्यास युवतीने नकार दिल्यावर राठोड याने फिर्यादीला अचानक जवळ ओढले व स्त्री मनात लज्जा निर्माण होईल असे कृत्य केले.

हेही वाचा- नवी मुंबई : नववर्षाचे स्वागत धुंदीत नव्हे शुध्दीत करण्याचे आवाहन

सदर पीडितेने स्वतःची सुटका केली व मित्रासमवेत सानपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यास गेली. त्यावेळी पोलीस उपनिरीक्षक अभय कदम हे कार्यरत होते. त्यांनी सदर युवतीला तक्रार न देण्याविषयी पटवून देण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे युवतीने आपले महाविद्यालय गाठले व तेथील सुरक्षा रक्षक अधिकार्याच्या मदतीने पवई पोलीस ठाण्यात तक्रर नोंदवली. याचा तपास सानपाडा पोलीस ठाण्याकडे आल्याने सानपाडा पोलिसांना कारवाई करणे भाग पडले व त्यांनी पोलीस नाईक राठोड याला अटक केले. व तो नियमाप्रमाणे निलंबित झाला. यानंतर सदर प्रकरणाचा तपास करून सहाय्यक आयुक्त गजानन राठोड यांनी तक्रार नोंदवण्यात कुसूर केल्याप्रकरणी अभय कदम यालाही निलंबित केले. या प्रकरणी सखोल तपास सुरु आहे अशी माहिती सहाय्यक पोलीस आयुक्त गजानन राठोड यांनी दिली.
 

Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: The police sub inspector who did not take the complaint of the girl who came to register the complaint of molestation at the sanpada police station was also suspended dpj