scorecardresearch

नवी मुंबई : नववर्षाचे स्वागत धुंदीत नव्हे शुध्दीत करण्याचे आवाहन

यावेळी ब्रह्माकुमारीज चे ‘व्यसनराज’ हे अत्यंत प्रभावी पथनाट्य सादर करण्यात आले. दिघा येथील शाळकरी मुलांनी ‘माणसाने माणसाशी माणसासम वागणे’ हे गीत सादर करण्यात आले.

नवी मुंबई : नववर्षाचे स्वागत धुंदीत नव्हे शुध्दीत करण्याचे आवाहन

नवी मुंबईतील अन्वय व्यसनमुक्ती केंद्र, प्रजापिता ब्रह्माकुमारीज तसेच नशाबंदी मंडळ महाराष्ट्र राज्य यांच्यावतीने ‘नववर्षाच्या स्वागत धुंदीत नव्हे तर शुद्धीत करूया’ ही टॅगलाईन घेऊन मिनी सीशोअर येथे पथनाट्य, घोषणा,पत्रके आणि गीतांद्वारे लोकांना मद्यपानाशिवाय नववर्षाचे स्वागत करण्याचं आवाहन करण्यात आले.

हेही वाचा- नवी मुंबई : राजकीय नेते, सिडको व मनपा अधिकारी यांच्या भ्रष्ट युतीतून नियोजित शहरात झोपडपट्टी निर्माण?

तसेच स्त्रीमुक्ती संघटनेच्या कार्यकर्त्या, विद्यार्थी, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सिंह, हत्ती, अशा प्राण्यांच्या गळ्यात ‘आम्ही दारू पीत नाही, तुम्ही माणूस असून दारू पिता?’ या आशयाचे बोर्ड प्रेक्षकांना अंतर्मुख करीत होता. ब्रह्माकुमारीज चे ‘व्यसनराज’ हे अत्यंत प्रभावी पथनाट्य सादर करण्यात आले. दिघा येथील शाळकरी मुलांनी ‘माणसाने माणसाशी माणसासम वागणे’ हे गीत सादर करण्यात आले.

हेही वाचा- नवी मुंबई महानगरपालिकेचा ३१ वा वर्धापन दिन जल्लोषात साजरा

एकीकडे नववर्षाच्या मद्यधुंद स्वागतासाठी तरुणाई प्रौढाई, आणि चक्क ज्येष्ठसुद्धा सज्ज झाली आहे. एवढेच काय महाराष्ट्र शासनाचा उत्पादन शुल्क विभाग सुद्धा सज्ज झाला आहे. पुण्यातच चार दिवसांपूर्वी दोन लाख लोकांना दारू पिण्याचे परवाने दिल्याची बातमी होती. म्हणजे मायबाप सरकार सुद्धा जास्तीत जास्त लोकांनी जास्तीत जास्त दारू प्यावी असे प्रोत्साहनात्मक वातावरण निर्मितीत मश्गुल असल्याचे दिसत आहे. हे चित्र एका बाजूला आणि अन्वय प्रतिष्ठान सारख्या असंख्य स्वयंसेवी संस्थांचे नववर्षाच्या स्वागतासाठी मद्यपानाच्या विरोधात प्रबोधन, जनजागृती करण्याचे प्रयत्न दुसऱ्या बाजूला सुरू आहेत, असे मत अन्वय व्यसनमुक्ती केंद्रचे प्रमुख अजित मगदूम यांनी याप्रसंगी व्यक्त केले आहे.

मराठीतील सर्व नवी मुंबई ( Navimumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 02-01-2023 at 17:17 IST

संबंधित बातम्या