नवी मुंबईतील सिडको प्रदर्शनी केंद्रात महालक्ष्मी सरस प्रदर्शन आणि विक्री२०२३ या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. या निमित्ताने आलेल्या ग्रामीण भागातील छोट्या व्यावसायिकांना सध्या चोरट्यांचा सामना करावा लागत आहे. ग्रामीण भागातून आलेल्या या छोट्या व्यावसायिकांची वाहवा होत असेल तरी चोरीचा फटका बसलेल्या या व्यावसायिकांना नेमके काय करावे हे सुधारत नाही. या बाबत आज महाराष्ट्र नवं निर्माण सेनेचे पदाधिकारी आणि महिलांचे शिष्टमंडळाने या प्रकरणी कोकण विभागीय आयुक्तांची भेट घेत गाऱ्हाणं मांडले. 

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा >>>पनवेल पालिकेवर जनआक्रोश मोर्चात जेष्ठांपासून चिमुरडी मुले सहभागी

ग्रामीण भागातील छोट्या सर्व प्रकारच्या व्यवसायिकांना मोठ्या शहरात व्यवसायाची संधी मिळावी त्यांच्या आत्मविश्वास वाढावा यासाठी सामाजिक संस्थे सोबत राज्य सरकारने वाशीतील सिडको प्रदर्शनी केंद्रात “महालक्ष्मी सरस ” हे प्रदर्शन विक्री मेळावा भरवला आहे. ६  मार्चला याचे उद्धाटन ग्रामविकास मंत्री गिरीश  महाजन यांच्या हस्ते पार पडले असून   १९ तारखे पर्यंत चालणार आहे.  या प्रदर्शनाला सुट्टीच्या दिवशी बऱ्यापैकी प्रतिसाद मिळत असून खवय्या लोकांचे पाय या ठिकाणी वळत आहेत. ग्रामीण चव चाखायला मिळत असून त्याचे कौतुकही होत आहे. असे होत असताना भुरट्या चोरांनी याचा  गैरफायदा घेत चोरट्यांचे सत्र सुरु झाले आहे. दोन दिवसांच्या पूर्वी लातूर येथील महिलेचे १५ हजार चोरीला गेल्यावर हि महिला हवालदिल झाली होती. मात्र याची दखल  तात्काळ घेतल्याने सीसीटीव्ही पाहून चोरट्यास पकडले व त्याच्या कडून पैसेही वसूल केले. मात्र या प्रकरणात सदर महिलेने पोलीस ठाण्यात तक्रार देण्यास नकार दिला. चोरी प्रकरण सुनवाई साठी सारखे लातूर हुन येथे यावे लागेल. असे कारण त्यांनी दिले.हीच गत पंजाब येथूल आलेल्या एका महिलेची असून तिलाही बोलण्यात गुंगवून साडे नऊ हजार चोरी केले हे पैसे मात्र अद्याप मिळाले नाहीत. या शिवाय अनेकांच्या छोट्या मोठ्या चोऱ्या झाल्या आहेत. यात केवळ पैसे नसून वस्तूंचाही समावेश आहे.

हेही वाचा >>>नवी मुंबई: गाड्यांच्या चाकांच्या चोरीने वाहनचालक हैराण, भंगार चोरी करणारी टोळी कार्यरत असल्याचा संशय

हे सर्व ग्रामीण भागातील असून चोरीचा गुन्हा दाखल केला तर सारखे गावाहून येथे यावे लागेल या भीतीपोटी कोणी पोलिसांच्या कडे तक्रार देत नाही. त्यामुळे  आयोजन स्वतः गुन्हा दाखल करू शकत होते असा दावा मनसेचे प्रदेश उपाध्यक्ष बाळासाहेब शिंदे यांनी केला. या प्रकरणी सोमवारी यांनी सरस  मध्ये सहभागी महिलांच्या सह कोकण आयुक्तांची भेट घेत गाऱ्हाणं मांडले. व असे प्रकार अशा प्रदर्शनात होतात हे हि चर्चा झाली तर पुढील प्रदर्शनात सहभागी होणार माहिती अशी भीतीही शिंदे यांनी व्यक्त करीत सदर महिलांची नुकसान भरपाई द्यावी आणि ठोस उपाययोजना कराव्या तसेच या प्रदर्शनाची व्यवस्थेतील त्रुटी सुरू करून जाहिरात चांगली करावी जेणेकरून या लोकांना घसघशीत फायदा व्हावा अशी मागणीचीही त्यांनी केली. 

धनंजय माळी अवर सचिव ग्राम विकास जिनोन्नती अभियान ) लातूर येथील महिला व्यावसायिकाचे १५ हजार रुपये चोरीला गेले होते. सीसीटीव्ही  पाहून चोरट्याला पकडले व पैसेही वसूल झाले. पैसे मिळाल्याने व गुन्हा नोंद केल्यावर वारंवार येथे यावे लागेल म्हणून त्यांनी गुन्हा नोंद केला नाही. इतर काही प्रकरणे  माहिती करून घेत आहोत. तसेच अतिरिक्त सुरक्षा कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात येणार असून काही चुकीचे घडले तर संपर्क साधण्याचे आवाहन केले जाईल. 

Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Thieves in mahalakshmi saras at cidco exhibition center in navi mumbai amy