उरण : सततच्या रहदारीच्या उरण पनवेल रस्त्यावर मोकाट गुरांची संख्या वाढली असून बोकडवीरा व वायु विद्युत प्रकल्पाच्या कामगार वसाहत परिसरातील रस्त्यावर ही गुरे ठिय्या मांडत असल्याने वाहने थांबवावी लागत आहे. त्यामुळे एकप्रकारे या गुरांचा अघोषित रस्ता रोकोच सुरू असतो. तर अनेक वाहनचालकांना अंदाज आल्याने तसेच गुरे अचानक वाहनांसमोर येत असल्याने अपघाताची शक्यता आहे. अशा प्रकारचे अपघात रात्रीच्या वेळी घडलेले आहेत. अंधारात वाहनचालकांना गुरे दिसत नसल्याने वाहनांची धडक लागून वाहनचालक व गुरांचाही अपघात होण्याची शक्यता वाढली आहे. तर अनेकदा भर रस्त्यात अचानकपणे दोन बैलांची झुंज ही सुरू होते. त्यावेळी वाहन चालकांची तारांबळ उडते. अशावेळी अनेकजण जखमी होण्याची शक्यता आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा : उरणच्या एनएमएमटी बसमध्ये भटक्या श्वानांचा मुक्काम? नागरिकांना घाणीची समस्या आणि श्वानांच्या हल्ल्याचा धोका

मोकाट गुरांची जबाबदारी कोणाची?

उरण मधील वाढते औद्योगिकीकरण आणि शहरीकरण यामुळे येथील शेती नष्ट झाली आहे. परिणामी शेतकरी शेतीत वापर करीत असलेली गुरे मोकाट झाली आहेत. या गुरांना आता कोणी मालक उरला नाही. तसेच गुरांचा उपयोग ही संपुष्टात आला आहे. तर जमिन कमी पडत असल्याने अनेक शेतकऱ्यांना इच्छा असूनही गुरे सांभाळता येत नाहीत. त्यामुळे मोकाट गुरांची जबाबदारी कोणाची असा प्रश्न निर्माण झाला आहे. गुरांच्या आरोग्याची ही समस्या उरण पनवेल रस्त्यावर मागील अनेक वर्षांपासून आहे. त्यांच्या चारा आणि पाण्याचाही प्रश्न आहे. यातील अनेक गुरे ही कचरा, प्लास्टिक खात आहेत. त्यामुळे त्यांच्या आरोग्याचीही समस्या निर्माण झाली आहे.

Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Uran citizens suffering due to cattle on uran panvel road increased chances of accidents css