नवी मुंबई – वाशी येथे ऐन दिवाळीत एमजी कॉम्प्लेक्स इमारतीला आग लागून जीवित हानी झाल्याची घटना ताजी असतानाच आज सकाळी ९.०८ वाशी सेक्टर १९ बी गुडविल बिल्डिंग शॉप नंबर १८, १९, २० स्विगी इन्स्टा मार्ट स्टोअरला आग लागली असून घटनास्थळी वाशी अग्निशमन दल व नेरूळ अग्निशमन गाड्या आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करत आहेत.

याबाबत नवी मुंबई महापालिका अग्निशमन विभागाचे अधिकारी पुरुषोत्तम जाधव यांनी वाशी येथील जुन्या आरटीओ ऑफिस शेजारील इमारतीतील काही गाळ्यांना आग लागली असून नवी मुंबई महापालिका अग्निशमन विभागाच्या चार गाड्या घटनास्थळी रवाना झाल्या आहेत.तसेच अग्निशमन विभागाकडून आग विझवण्याचे काम सुरु असल्याची माहिती लोकसत्ताला दिली.

नवी मुंबई शहरात आगीच्या घटना वाढत असून याबाबत नवी मुंबई महापालिका अग्निशमन विभागाने अधिक खबरदारी घेण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे.