आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

प्रत्येक स्तरावर मूळ तत्त्वावर होणाऱ्या मूल्यवृद्धीची दोन अंगे आहेत. बदलत्या स्वरूपाप्रमाणे होणारा अर्थव्यय आणि गुणात्मक मूल्यवृद्धी. उदाहरणादाखल कच्चा माल, कापूस, पिंजणे या प्रक्रियेतून जाताना त्याचे गासडी/ गठ्ठय़ापासून एक-एक तंतूमध्ये रूपांतर होऊन नंतर पेळूमध्ये रूपांतर होते.
कच्चा माल- प्रक्रिया- उत्पादन (प्रॉडक्ट) यामधील संबंधमयता परिचयाकरिता म्हणून बघू या. नंतर या माहितीच्या व्यापक विस्ताराचा परिचय करून दिला जाईलच. कच्चा माल- प्रक्रिया- उत्पादन (प्रॉडक्ट) यामधील संबंधमयता चौकटीत दिले आहे.
कापसाच्या बीजासंबंधात झालेल्या अभियांत्रिकीमधील संशोधनाने (जेनेटिक इंजिनीयिरग) व यंत्रांच्या विकसित तंत्रज्ञानामुळे आणि इलेक्ट्रॉनिक व हवेचा (एरोडायनॅमिक) कुशल उपयोग यामुळे संभव झालेले, विनाचाती सूतकताईचे तंत्र यामुळे संपूर्ण वस्त्रविश्वात आमूलाग्र क्रांती झाली. सोबतची चित्रे ही या विकसनाची साक्ष आहेत. अति प्राचीन ते ओपन एंड ही विकसन क्रांती या चित्रांवरून स्पष्ट होते.
श्वेतकेतू

संस्थानांची बखर: ब्रिटिश व्यापारी कंपनीचे आगमन
भारतीय प्रदेशात व्यापारी व राजकीय पाया भक्कम रोवून हा खंडप्राय प्रदेश ब्रिटिश साम्राज्यात सामील करण्याचे अत्यंत अवघड कार्य लंडनमधील एक व्यापारी संस्था ईस्ट इंडिया कंपनीने केले. या संस्थेने हे काम त्यांच्या इतर युरोपियन स्पर्धक व्यापारी कंपन्या आणि मोगल आणि मराठय़ांसारख्या आधीच प्रस्थापित झालेल्या राज्यकर्त्यांशी दोन हात करून शिताफीने केले. त्यामुळे ही व्यापारी संस्था आजतागायतच्या व्यापारी कंपन्यांच्या इतिहासात सर्वोच्च समजली जाते.
ईस्ट इंडिया कंपनीने १६०८ साली भारतात सुरत येथे प्रथम आपली छोटीशी वसाहत तयार करून सुरत हे आपले पहिले भारतीय ठाणे बनविले. सतराव्या शतकाच्या सुरुवातीस ब्रिटिशांचे भारतात आगमन झाले. त्या काळातील भारतातील राजकीय परिस्थिती आणि युरोपियन देशांचे एकमेकांशी संबंध यांचा ब्रिटिशांशी सत्तासंपादनाशी फार जवळचा संबंध आहे.
ब्रिटिश लोक भारतात येण्यापूर्वी प्रचंड मोठय़ा संख्येने असलेल्या येथील स्थानिक राज्यांपकी अधिकतर राज्यांनी मोगलांचे मांडलिकत्व किंवा आधिपत्य स्वीकारले होते. त्याचप्रमाणे बऱ्याच मोठय़ा संख्येने राज्यकर्त्यांनी मराठय़ांचेही वर्चस्व मान्य केलेले होते.
 मराठय़ांनी तर दूर दक्षिणेतही आपली राज्ये स्थापली होती. मोगल, मराठा ही दोन बलाढय़ साम्राज्ये, त्यांची मांडलिक राज्ये, या राज्यांचे असंख्य जहागीरदार, इनामदार, वतनदार, सरंजामदार हे सर्व स्वतला राजे किंवा नवाब म्हणवून घेत. या सर्वानी व्यापलेला िहदुस्थान हा भूप्रदेश एक अखंड देश म्हणून समजला जात नव्हता.
सुनीत पोतनीस – sunitpotnis@rediffmail.com

मराठीतील सर्व नवनीत बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Curiosity textile industry