पालघर : पालघर नगर परिषदेच्या सन २०२५ मध्ये होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने भौगोलिक सीमांसह प्रारूप प्रभाग रचना जाहीर करण्यात आली असून याविषयी ३१ ऑगस्ट पर्यंत हरकती व सूचना मागविण्यात आल्या आहेत. सन २०११ च्या लोकसंख्येच्या आधारे प्रभाग रचना करण्यात आली असून नगर परिषद क्षेत्रामधून ३० सदस्यांना निवडून द्यावयाचे आहे. शहरातील ६८ हजार ९३० लोकसंख्येपैकी अनुसूचित जातीचे ३४१९ तर अनुसूचित जमातीची ९७२० लोकसंख्या असल्याचे दिसून आले आहे.

नगर परिषदेत दोन सदस्य असणारे १५ प्रभागाची रचना करण्यात आली असून प्रभाग रचना करताना ४५९५ लोकसंख्या अनुसरून प्रारूप प्रभाग रचना करण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे. नगरपरिषदेमधील नियोजित प्रभागांमध्ये किमान ४१३५ ते कमाल ५०५५ लोकसंख्येच्या आधारे प्रभाग रचना करण्यात आल्याची माहिती नगरपरिषदेने प्रसिद्ध केली आहे.

सन २०१९ मध्ये झालेल्या नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या प्रभाग रचने मोठ्या प्रमाणात बदल झाला असून यामुळे विद्यमान नगरसेवक व नगरपरिषद निवडणूक लढविण्यास इच्छुक असणाऱ्या मंडळींमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे. ३१ ऑगस्ट पर्यंत याविषयी आक्षेप नोंदवण्यात आल्यानंतर अंतिम निर्णय घेऊन प्रभाग रचना व त्यावरील आरक्षण जाहीर करण्यात येणार