Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. elections gallery
  4. bachhu kadu slams amravati amit shah election rally pavillon collapsed kvg

Photo : अमित शाहांच्या सभेचा मंडप कोसळला, बच्चू कडू म्हणाले, “हनुमानजींनी…”

अमरावतीमध्ये प्रचारसभेवरून बच्चू कडू आणि रवी राणा आमनेसामने आले आहेत. सायन्स कोर मैदानावरील बच्चू कडूंच्या सभेला पोलिसांनी विरोध केला. त्यानंतर पावसामुळे अमित शाहांच्या सभेचा मंडपच उडून गेला. त्यावर बच्चू कडू यांनी खोचक टीका केली.

April 23, 2024 19:53 IST
Follow Us
  • bachhu kadu criticized police action _ 7
    1/9

    अमरावतीच्या सायन्स कोर मैदानावर आज जोरदार राडा पाहायला मिळाला. प्रहार जनशक्ती पक्षाचे नेते बच्चू कडू आणि पोलीस अधिकारी यांच्यात सभेच्या जागेवरून जोरदार खडाजंगी झाली. (Photo – Bacchu Kadu Facebook)

  • 2/9

    बच्चू कडू यांच्याकडे सायन्स कोर मैदानात २३ आणि २४ एप्रिल रोजी प्रचार सभा घेण्याची परवानगी होती. मात्र पोलिसांनी त्यांना सभास्थळी जाण्यापासून अडविले. (Photo – Bacchu Kadu Facebook)

  • 3/9

    बच्चू कडू यांनी त्यांच्याकडे असलेली निवडणूक आयोगाच्या परवानगीची प्रतच पोलिसांनी दाखविली आणि सभा घेण्यापासून का विरोध केला जात आहे? असा प्रश्न उपस्थित केला.

  • 4/9

    उद्या २४ एप्रिल रोजी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे भाजपाच्या उमेदवार नवनीत राणा यांच्यासाठी प्रचार सभा घेणार आहेत. त्यासाठी बच्चू कडू यांची सभा रद्द करण्यात आल्याचे पोलिसांनी त्यांना सांगितले.

  • 5/9

    पोलीस हे भाजपाचे कार्यकर्ते असल्यासारखे वागत असल्याचा आरोप करून बच्चू कडू यांनी तिथेच पोलिसांसमोर ठिय्या मांडला.

  • 6/9

    मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याबाबत बोलताना म्हटले की, निवडणुकीच्या वेळी असे प्रसंग अनेकदा येतात. मोठे नेते जेव्हा प्रचारासाठी येतात, तेव्हा त्यांना प्राधान्य दिले जाते. बच्चू कडू यांच्याशी आमची सकारात्मक चर्चा झाली असून त्यातून नक्कीच तोडगा निघेल.

  • 7/9

    दरम्यान जोरदार पावसामुळे सायन्स कोर मैदानावरील अमित शाह यांच्या सभेचा मंडप कोसळला. “हनुमानजीने त्यांच्या मंडपावर एक लाथ मारली. त्यांची हनुमान चालीसा चुकीच्या हेतूसाठी होती आणि आता आमच्याबरोबर जे चुकीचं होत होतं, त्याला देवाने उत्तर दिलं आहे”, असा टोला बच्चू कडू यांनी लगावला.

  • 8/9

    रवी राणा भाजपाला बदनाम करतोय, हे अमित शाहांनाही माहीत नसेल. भाजपा सारख्या शिस्तप्रिय पक्षाला रवी राणा सारखे लोक बदनाम करत आहेत. आता भाजपाला रवी राणा सारखे लोक नियंत्रित करत आहेत, अशी टीका बच्चू कडू यांनी केली.

  • 9/9

    प्रहार जनशक्ती पक्षाकडून नवनीत राणा यांच्या विरोधात दिनेश बुब निवडणूक लढवित आहेत. २६ एप्रिलला अमरावतीमध्ये मतदान होणार असून उद्या प्रचाराचा शेवटचा दिवस आहे.

TOPICS
नवनीत राणाNavneet Ranaबच्चू कडूBachchu Kaduरवी राणाRavi Ranaलोकसभा निवडणूक निकाल २०२४ (Lok Sabha Election Result 2024)Lok Sabha Election

Web Title: Bachhu kadu slams amravati amit shah election rally pavillon collapsed kvg

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.