-
उत्तर प्रदेशमधील कैसरगंज लोकसभा मतदारसंघ मागच्या काही दिवसात चर्चेत राहिला आहे. यावेळच्या निवडणुकीत विद्यमान खासदार असलेले ब्रिजभूषण शरण सिंह यांचा भाजपाकडून पत्ता कट केला जाऊ शकतो अशी चर्चा सुरू होती आणि तसंच झालं. (@Karan Bhushan Singh)
-
ब्रिजभूषण यांचं तिकीट कापल असलं तरी मात्र भाजपाने त्यांच्याच मुलाला उमेदवारी जाहीर केली आहे.
-
करण भूषण यांना भाजपाने रिंगणात उतरवले आहे. करण भूषण यांच्याबद्दल जाणून घेऊयात.
-
करण भूषण हे ब्रिजभूषण सिंह यांचे लहान चिरंजीव आहेत. डबल ट्रॅप नेमबाजी या क्रीडा प्रकाराचे ते खेळाडू राहिलेले आहेत.
-
डॉ. राममनोहर लोहिया अवध विद्यापीठातून त्यांनी बीबीए आणि एलएलबीचे शिक्षण पूर्ण केले आहे.
-
यानंतर ऑस्ट्रेलियामध्ये त्यांनी शिक्षण घेतले आहे. बिझनेस मॅनेजेंटमध्ये त्यांनी डिप्लोमा केला आहे.
-
सध्या करण भूषण सिंह उत्तर प्रदेश कुस्तीसंघाचे अध्यक्ष आहेत. याशिवाय करण भूषण हे नवाबगंजमधील सहकारी ग्राम विकास बँकेचेही अध्यक्ष आहेत.
-
ब्रिजभूषण शरण सिंह हे कैसरगंजमधून तीन वेळा खासदार आहेत. याशिवाय ते दोन वेळा गोंडा आणि एकवेळा बहराइच या मतदारसंघातूनही खासदार राहिले आहेत.
ब्रिजभूषण शरण सिंहांचा पत्ता कट; भाजपाने दिलेल्या नव्या उमेदवाराबद्दल जाणून घ्या
उत्तर प्रदेशमधील कैसरगंज लोकसभा मतदारसंघात भारतीय जनता पार्टीने विद्यमान खासदार ब्रिजभूषण शरण सिंह यांचं तिकीट कापलं आहे. भाजपाने ब्रिजभूषण यांच्याऐवजी…
Web Title: Brij bhushan singh son and former shooter karan bhushan singh is bjp kaiserganj candidate know education jshd import spl