-
आज लोकसभा निवडणुकीचा तिसरा टप्पा आहे. या तिसऱ्या टप्प्यात महाराष्ट्रातील एकूण ११ मतदारसंघात मतदान सुरु झाले आहे. (Photos- Express photograph by Arul Horizon)
-
महाराष्ट्रातील बहुचर्चित लढत असलेल्या बारामती मतदारसंघातील उमेदवारांनी आज त्यांचे मतदान केले. तसेच दोन्ही गटातील पवार कुटुंबीयांनी त्यांचा मतदानाचा हक्क बजावला.
-
बारामतीतील नणंद (सुप्रिया सुळे) विरुद्ध भावजयी (सुनेत्रा पवार) यांच्यातील लढतीने सगळ्या देशाचे लक्ष वेधून घेतले होते.
-
अजित पवार गटाच्या उमेदवार सुनेत्रा पवार आहेत तर शरद पवार गटाच्या उमेदवार सुप्रिया सुळे आहेत.
-
दरम्यान, बारामतीकर यंदा कोणाच्या पारड्यात भरघोस मतदान टाकतील हे ४ जूनला निकालाच्या दिवशी कळेल.
-
सुनेत्रा पवार मतदान केंद्रावर त्यांचे मतदान करण्यासाठी पोहोचल्या.
-
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही त्यांचाबरोबर मतदान केले.
-
पवार कुटुंबातील नव्या पिढीनेही मतदान केंद्रावर हजेरी लावली.
-
पवार कुटुंबातील सदस्यांनीही मतदान केंद्रावर हजेरी लावली.
-
सुप्रिया सुळे आणि वडील शरद पवार यांनी सकाळी मतदान केंद्रावर जाऊन मतदानाचा हक्क बजावला.
-
पवार कुटुंबातील सदस्य मतदान केल्यानंतर माध्यमांना शाई लावलेली बोटे दाखवताना.
पवार कुटुंबाच्या दोन्ही गटातील नव्या पिढीसह ज्येष्ठ सदस्यांनी बजावला मतदानाचा हक्क! पहा फोटो
बारामतीमध्ये आज तिसऱ्या टप्प्यात लोकसभा निवडणुकीचे मतदान पार पडत आहे.
Web Title: Pawar family latest news all family caste there vote at baramati loksabha election spl