-
मतदान प्रक्रियेत ईव्हीएममध्ये फेरफार करण्यासाठी शिवसेनेचे (उबाठा) नेते अंबादास दानवे यांच्याकडून अडीच कोटी रुपयांची मागितला असल्याचा प्रकार समोर आला आहे. (सर्व फोटो अंबादास दानवे या फेसबुक पेजवरून साभार.)
-
याप्रकरणी छत्रपती संभाजीनगर शहरात एका लष्करी जवानाला पोलिसांनी अटक केली आहे, असे एका अधिकाऱ्याने सांगितले.
-
“मारुती ढाकणे (४२) या आरोपीने इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीनमध्ये चिपच्या माध्यमातून फेरफार करण्यासाठी पैसे मागितल्याचा आरोप विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते दानवे यांनी केला.
-
याप्रकरणी त्यांनी पोलिसांकडे लेखी तक्रार दाखल केली”, असे एका पोलीस अधिकाऱ्याने मंगळवारी सांगितले.
-
“आरोपीच्या डोक्यावर कर्ज होतं. हे कर्ज फोडण्यासाठी त्याने पैशांची मागणी केली आहे. पण त्याला ईव्हीएमबद्दल काहीच माहिती नाही, असे पोलिसांनी सांगितले.
-
मंगळवारी दुपारी चारच्या सुमारास आरोपीने अंबादास दानवे यांचे धाकटे भाऊ राजेंद्र दानवे यांची जवळच्या हॉटेलमध्ये भेट घेतली.
-
अंबादास दानवे यांनी दिलेल्या माहितीच्या आधारे याठिकाणी झालेल्या चर्चेनंतर दीड कोटी रुपयांचा करार झाला होता, त्याने राजेंद्र दानवे यांच्याकडून टोकन रक्कम म्हणून १ लाख रुपये घेतले”, असंही पोलिसांनी स्पष्ट केलं.
-
“आरोपीच्या डोक्यावर कर्ज आहे. कर्जातून बाहेर पडण्यासाठी त्याने ही युक्ती केली. त्याला मशीन (EVM) बद्दल काहीच माहिती नाही. तो चीटर असून आम्ही त्याला अटक केली आहे. येथील क्रांती चौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे”, असे पोलिसांनी सांगितले.
-
लष्करी जवानाविरोधात गुन्हा दाखल
आरोपींविरुद्ध भारतीय दंड संहिता कलम ४२० (फसवणूक) आणि ५११ (गुन्हा करण्याचा प्रयत्न) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे, असे आणखी एका अधिकाऱ्याने सांगितले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी येथील रहिवासी असून तो जम्मू-काश्मीरमधील उधमपूर येथे तैनात आहे.
मतदानादरम्यान ईव्हीएममध्ये फेरफार करण्यासाठी आरोपीचा थेट विरोधी पक्षनेत्याला गळ घालायचा प्रयत्न; गुन्हा दाखल
कर्जाच्या विळख्यातून बाहेर पडण्यासाठी हा बनाव रचून आरोपीने कृत्य केल्याचे पोलिसांनी माध्यमांना दिलेल्या माहितीत सांगितलं आहे.
Web Title: Shivsena leader amabadas danve sambhajinagar evm machine news crime news news spl