Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. elections gallery
  4. elections announced for 4 seats of vidhan parishad in maharashtra latest election news spl

महाराष्ट्रात विधान परिषदेच्या ४ जागांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर; ‘या’ दिवशी होणार मतदान

७ जुलै २०२४ रोजी विधान परिषदेच्या चार सदस्यांचा कार्यकाळ पूर्ण होणार असून या जागा रिक्त होणार आहेत. (सर्व फोटो संग्रहित आणि प्रतीकात्मक आहेत.)

Updated: May 9, 2024 18:48 IST
Follow Us
  • vidhan parishad election maharashtra
    1/9

    येत्या ७ जुलै २०२४ रोजी विधान परिषदेच्या चार सदस्यांचा कार्यकाळ पूर्ण होणार असून या जागा रिक्त होणार आहेत. त्या प्रार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाकडून या चार जागांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे.

  • 2/9

    यामध्ये दोन पदवीधर तर दोन शिक्षक मतदारसंघाचा समावेश आहे.

  • 3/9

    निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार, १० जून रोजी मुंबई पदवीधर मतदार संघ, मुंबई शिक्षक मतदारसंघ तसेच कोकण पदवीधर मतदारसंघ आणि नाशिक शिक्षक मतदारसंघसाठी निवडणूक होणार आहे.

  • 4/9

    त्यासाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. त्यानुसार, १५ मे रोजी या चार जागांसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची प्रकिया सुरू होणार आहे. तर २२ मे हा उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस असणार आहे.

  • 5/9

    अर्ज प्राप्त झाल्यानंतर २४ मे रोजी अर्जांची छाणणी केली जाणार आहे. तसेच अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख २७ मे आहे.

  • 6/9

    तर प्रत्यक्ष मतदान हे १० मे रोजी होणार आहे.

  • 7/9

    महत्त्वाचे म्हणजे सकाळी ८ ते दुपारी ४ दरम्यान मतदान होणार असून मतमोजणी १३ जून रोजी होणार असल्याचे निवडणूक आयोगाकडून सांगण्यात आलं आहे.

  • 8/9

    दरम्यान, ७ जुलै २०२४ रोजी मुंबई पदवीधर मतदारसंघाचे आमदार विलास पोटनिस, कोकण पदवीधर मतदारसंघाचे आमदार निरंजन डावखरे, नाशिक शिक्षक मतदारसंघाचे आमदार दराडे भिकाजी तसेच मुंबई शिक्षक मतदारसंघाचे आमदार कपील पाटील यांचा कार्यकाळ संपणार आहे. त्यामुळे या चार जागांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे.

  • 9/9

    हेही पाहा- “गणेशाच्या कृपेने नवी मुंबईकर नक्कीच…” राजन विचारेंच्या ‘त्या’ विधानामुळे तर्क-वितर्कांना उधाण

TOPICS
मराठी बातम्याMarathi Newsमहाराष्ट्र विधान परिषदMaharashtra Legislative CouncilराजकारणPoliticsविधान परिषद निवडणूकLegislative Council Election

Web Title: Elections announced for 4 seats of vidhan parishad in maharashtra latest election news spl

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.