• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • वाचक सर्वेक्षण
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • संसदीय अधिवेशन
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. elections gallery
  4. who will win this time in the fight in solapur congress or bjp candidate praniti shinde vs ram satpute spl

सोलापूरमध्ये मतदानानंतर दोन्ही उमेदवारांचा विजयाचा दावा; वाचा काय आहे स्थिती

सोलापूर लोकसभा मतदारसंघ पूर्वी काँग्रेसचा बालेकिल्ला होता. मात्र २०१४ नंतर मोदी लाटेत येथील राजकीय परिस्थिती बदलली.

Updated: May 9, 2024 18:38 IST
Follow Us
    solapar fight who win
solapar fight who win
    लोकसभा निवडणूकीत तिसऱ्या टप्प्यात राज्यातील प्रमुख लढतीपैकी असलेल्या सोलापूर लोकसभेसाठी ५९.१९ टक्के इतके चुरशीने मतदान झाले. ही लढत काँग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे आणि भाजपचे आमदार राम सातपुते यांच्यात थेट लढत झाली.
    मतदान प्रक्रिया संपल्यानंतर दोन्ही पक्षांनी विजयाबद्दल दावे-प्रतिदावे केले. राजकीय जाणकारांच्या नजरेतूनही ही लढत २५ हजार ते ५० हजार मताधिक्याने कौल देणारी असल्यामुळे खासदारकीची माळ नेमक्या कोणाच्या गळ्यात पडणार, याची सार्वत्रिक उत्सुकता आहे.
    सोलापूर लोकसभा मतदारसंघ पूर्वी काँग्रेसचा बालेकिल्ला होता. मात्र २०१४ नंतर मोदी लाटेत येथील राजकीय परिस्थिती बदलली. यात काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांना सलग दोनवेळा पराभूत व्हावे लागले होते.
    त्यानंतर विधानसभा निवडणूकीतही सोलापूरचे चित्र बदलले. येथील सहापैकी पाच विधानसभेच्या जागा महायुतीच्या राहिल्या आहेत. तर केवळ एकमेव प्रणिती शिंदे या काँग्रेसच्या आमदार आहेत.
    सोलापूर लोकसभा मतदार संघात अक्कलकोट, उत्तर सोलापूर, सोलापूर मध्य, सोलापूर दक्षिण, मोहोळ, पंढरपूर-मंगळवेढा या मतदारसंघाचा समावेश होतो.
    मागील २०१४ आणि २०१९ सालच्या लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या विजयाची पुनरावृत्ती करण्याच्या तयारीने भाजप रिंगणात उतरली होती. मात्र पाच आमदार असतानाही भाजपसाठी देखील लढाई सोपी नव्हती.
    सोलापूर लोकसभा मतदार संघात अक्कलकोट, उत्तर सोलापूर, सोलापूर मध्य, सोलापूर दक्षिण, मोहोळ, पंढरपूर-मंगळवेढा या मतदारसंघाचा समावेश होतो. यातील अक्कलकोट, उत्तर सोलापूर, दक्षिण सोलापूर, पंढरपूर-मंगळवेढा या मतदारसंघात भाजपचे आमदार आहेत. तर मोहोळमध्ये राष्ट्रवादी अजित पवार गटाचा आमदार आहे सोलापूर शहर मध्य मतदारसंघात एकमेव काँग्रेसचा आमदार आहे.
    या निवडणुकीत काँग्रेसच्या प्रणिती शिंदे यांनी उमेदवारी जाहीर होण्याअगोदरच प्रचारात आघाडी घेतली होती. त्यांनी गावागावात जाऊन कोपरा सभा, बैठका आणि जनतेशी थेट संवाद साधण्यावर भर दिला.
    तर उशिरा उमेदवारी मिळालेले भाजपचे राम सातपुते यांनी दिग्गज नेत्यांच्या सभांवर भर दिला. यात पंतप्रधान नरेंद्र मोदी, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी इत्यादी नेत्यांच्या सभांचा समावेश होता.
    तर काँग्रेससाठी राहुल गांधी यांची एकमेव मोठी जाहीर सभा झाली होती. शेतकऱ्यांचे प्रश्न, मराठा आरक्षणाच्या मुद्द्यासह सोलापुरातील पाणी प्रश्न, उद्योग धंद्याचा प्रश्न, सोलापुरातील बेरोजगारी हे मुद्दे मोठ्या प्रमाणात चर्चेत आले.
    तर भाजपने ही निवडणूक राष्ट्रीय मुद्याकडे देखील वळवण्याचा प्रयत्न केला. धार्मिक धुर्वीकरणाचे राजकारण देखील यंदाच्या निवडणूकीत मोठ्या प्रमाणात पाहायला मिळाले. या सर्व बाबींचा थेट परिणाम निकालावर होणार आहे.
    (सर्व फोटो प्रणिती शिंदे आणि राम सातपुते यांच्या फेसबुक खात्यांवरून साभार)
    हेही पाहा- महाराष्ट्रात विधान परिषदेच्या ४ जागांसाठी निवडणूक जाहीर! जाणून घ्या तारीख
TOPICS
काँग्रेसCongressप्रणिती शिंदेPraniti Shindeभारतीय जनता पार्टीBJPमराठी बातम्याMarathi Newsलोकसभा निवडणूक निकाल २०२४ (Lok Sabha Election Result 2024)Lok Sabha Election

Web Title: Who will win this time in the fight in solapur congress or bjp candidate praniti shinde vs ram satpute spl

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.