• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • आजचा जोक
  • लोकसत्ता प्रीमियम
  • राहुल गांधी
  • देवेंद्र फडणवीस
  • नरेंद्र मोदी
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. elections gallery
  4. loksabha election fifth phase all voting details latest political news spl

लोकसभा निवडणुकीचा देशातील पाचवा तर महाराष्ट्रातील शेवटचा टप्पा; ‘या’ दिग्गजांचं भवितव्य पणाला! वाचा संपूर्ण माहिती

Lok Sabha Election Fifth Phase: आज देशात पाचव्या टप्प्याचं मतदान पार पडणार आहे. या टप्प्यात अनेकांचं भवितव्य पणाला लागलंय.

Updated: May 20, 2024 09:57 IST
Follow Us
  • maharashtra loksabha election first phase
    1/10

    एकेक टप्पा पार करत आता लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यासाठी २० मे २०२४ रोजी देशात मतदान होत आहे.

  • 2/10

    देशातील एकूण ६ राज्ये आणि दोन केंद्रशासित प्रदेशात ४९ मतदारसंघांसाठी मतदान प्रक्रिया पार पडत आहे.

  • 3/10

    या टप्प्यात एकूण ६९५ उमेदवारांचे भवितव्य मतदार ठरवणार आहेत.

  • 4/10

    महाराष्ट्र, बिहार, पश्चिम बंगाल, जम्मू काश्मीर, झारखंड, लडाख, ओडिशा, उत्तर प्रदेश या ठिकाणी पाचव्या टप्प्यासाठी मतदान होत आहे.

  • 5/10

    महाराष्ट्रात मुंबईतील पूर्ण सहाच्या सहा मतदारसंघात मतदान होत आहे. यामध्ये दक्षिण मुंबई, दक्षिण मध्य मुंबई, उत्तर मुंबई, उत्तर मध्य मुंबई, उत्तर पूर्व मुंबई, वायव्य मुंबई या जागांचा समावेश आहे. याशिवाय ठाणे, कल्याण, पालघर, नाशिक, धुळे, दिंडोरी, आणि भिवंडी अशा १३ लोकसभा मतदारसंघात मतदान पार पडेल.

  • 6/10

    उत्तर प्रदेशमध्ये १३, पश्चिम बंगालमध्ये ७, बिहारमध्ये ५, जम्मू आणि काश्मीरमध्ये १, लडाखमध्ये १, झारखंडमध्ये ३, ओडिशातील ५ जागांवर लोकसभा निवडणुकीचं मतदान होत आहे.

  • 7/10

    लोकसभा निवडणुकीच्या या पाचव्या टप्प्यात अनेक दिग्गजांचे भवितव्य पणाला लागले आहे. राहुल गांधी, स्मृती इराणी, राजनाथ सिंह यांच्या लढतीकडे देशाचं लक्ष आहे.

  • 8/10

    महाराष्ट्रातही अनेक दिग्गज उमेदवारांच भवितव्य उद्या मतपेटीत कैद होईल. ज्यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा बालेकिल्ला अशी ओळख असलेल्या ठाणे कल्याण मतदारसंघांचा समावेश आहे. येथून श्रीकांत शिंदे, नरेश म्हस्के, वर्षा दरेकर राणे, राजन विचारे हे उमेदवार लढत देत आहेत. तर मुंबईतील सर्व सहा ठिकाणच्या लढतीमध्ये अरविंद सावंत, यामिनी जाधव, उज्वल निकम, वर्षा गायकवाड यांचं भवितव्य मतदानातून ठरणार आहे.

  • 9/10

    भारतात कोणतीही निवडणूक ही लोकशाहीचा उत्सव मानली जाते. मात्र, पार पडलेल्या सर्व टप्प्यात मतटक्का घसरल्याचं पाहायला मिळालं होतं. त्यामुळं मतदान प्रक्रियेत मतटक्का वाढणार का? याकडे सर्वांच लक्ष लागलेलं आहे.

  • 10/10

    (सर्व फोटो प्रतीकात्मक आणि संग्रहित)

TOPICS
निवडणूक आयोगElection Commissionनिवडणूक २०२४Electionमराठी बातम्याMarathi Newsलोकसभा निवडणूक निकाल २०२४ (Lok Sabha Election Result 2024)Lok Sabha Election

Web Title: Loksabha election fifth phase all voting details latest political news spl

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.