-
लोकसभा निवडणुकीच्या सातव्या आणि अखेरच्या टप्प्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाराणसी मतदार संघात मतदान होणार आहे.
-
१ जून रोजी देशात शेवटच्या टप्प्याचे मतदान होत आहे.
-
देशाचे लक्ष लागलेल्या या वाराणसी मतदारसंघात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची ही तिसरी लोकसभा निवडणूक आहे.
-
अबकी बार ४०० पार असा नारा दिलेल्या भाजपाने देशात मोठ्या प्रमाणावर प्रचार केला आहे.
-
तर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे वाराणसी येथून तिसऱ्यांदा लढत आहेत. ते निवडून आले तर त्यांची विजयाची ही हॅटट्रिक होईल.
-
२०१४ आणि २०१९ साली झालेल्या निवडणुकीत भाजपाने देशात पंतप्रधान पदाचा चेहरा म्हणून नरेंद्र मोदी यांच्यावर जबाबदारी टाकली होती. २०२४ मध्येही तीच स्थिती आहे.
-
दरम्यान, नरेंद मोदी यांनी मागील दोन निवडणुकीत या मतदारसंघात किती मतदान मिळवले होते हे आपण जाणून घेऊ.
-
२०१४ साली झालेल्या निवडणुकीत मोदींना ६ लाख ७४ हजार ६६४ मते वाराणसीकरांनी दिली होती.
-
तर २०१९ मध्ये नरेंद्र मोदींना ५ लाख १६ हजार ५९३ मिळाली होती. त्यांच्याविरुद्ध अरविंद केजरीवाल यांनी निवडणूक लढवली होती.
-
यंदाच्या २०२४ लोकसभा निवडणुकीत मोदींना रोखण्यासाठी काँग्रेसनं अजय राय यांना उमेदवारी दिली असून वाराणसीमधील एकूण १९ लाख ६२ हजार मतदार यंदा कोणाला खासदार म्हणून निवडणार? याकडे देशाचं लक्ष आहे. (सर्व फोटो लोकसत्ता संग्रहित) हे देखील वाचा- मुंबई शिक्षक निवडणुकीसाठी अजित पवार गटाने निवडलेले उमेदवार शिवाजीराव नलावडे कोण आहेत?
वाराणसीतील १९ लाख मतदार यंदा पंतप्रधान मोदींबाबत काय फैसला करणार; मागील दोन निवडणुकीतील मते किती?
लोकसभा निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यात देशात १ जून रोजी मतदान होणार आहे. यामध्ये ८ राज्यांतील ५७ जागांवर मतदान होईल तर निकाल ४ जून रोजी घोषित होतील.
Web Title: What will the 19 lakh voters in varanasi decide about prime minister modi this year how many votes in the last two elections spl