• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • दिवाळी २०२५
  • देवेंद्र फडणवीस
  • QUIZ-बिहार निवडणूक
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. elections gallery
  4. who is aparajita sarangi wins bhubaneswar lok sabha election name in odisha chief minister race net worth property assets and education spl

ओडिशा: २४ व्या वर्षी IAS, २०१८ मध्ये राजकारणात प्रवेश, आता थेट मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत! कोण आहेत अपराजिता सारंगी?

ओडिशामध्ये मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत अनेक नावं आहेत परंतु अचानकपणे अपराजिता सारंगी यांच्या नावाचीही चर्चा सुरू झाली आहे.

Updated: June 6, 2024 14:32 IST
Follow Us
  • Aparajita Sarangi net worth, property
    1/10

    लोकसभा निवडणुकीच्या निकालाच्या दिवशीच ओडिशा विधानसभा निवडणुकीचीही मतमोजणी झाली. ओडिशामध्ये भाजपला दोन्ही निवडणुकीत मोठा विजय मिळाला आहे. ओडिशामधील बिजू जनता दल या पक्षाच्या २४ वर्ष सुरू असलेल्या सत्ता केंद्राला भाजपाने यावर्षी सुरुंग लावला. यावर्षीच्या विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपाने १४७ जागांपैकी एकूण ७८ जागांवर विजय प्राप्त केला आहे. (@Aparajita Sarangi/FB)

  • 2/10

    त्यामुळे ओडिशामध्ये पुढील मुख्यमंत्री कोण होणार? याची चर्चा जोर धरत आहे. मुख्यमंत्री पदासाठी मुख्यतः ज्या नावावर चर्चा होत आहे त्या नावांमध्ये केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान, वैजयंत पांडा, भुवनेश्वरच्या खासदार अपराजिता सारंगी, प्रताप सारंगी, गिरीश मुर्मू, संबीत पात्रा, नारायण मिश्रा आणि मनमोहन सामल यांच्या नावांचा समावेश आहे. (@Aparajita Sarangi/FB)

  • 3/10

    दरम्यान अपराजिता सारंगी या भुवनेश्वरमधून तिरंगी लढतीत काँग्रेस, बीजेडीच्या उमेदवारांना यांना पराभूत करून खासदार झाल्या आहेत. (@Aparajita Sarangi/FB)

  • 4/10

    अपराजिता सारंगी या आयएएस अधिकारी राहिलेल्या आहेत. त्यांचे पती संतोष कुमार सारंगी हे देखील आयएएस अधिकारी आहेत. अपराजिता यांची सामाजिक सामाजिक कार्यकर्ता म्हणूनही ओळख आहे. (@Aparajita Sarangi/FB)

  • 5/10

    बिहारच्या मुजफ्फरमध्ये अपराजिता यांचा जन्म झाला. १९९४ मध्ये यूपीएससीची परीक्षा त्या उत्तीर्ण झाल्या, तेव्हा त्या केवळ २४ वर्षांच्या होत्या. (@Aparajita Sarangi/FB)

  • 6/10

    अपराजिता सारंगी यांनी २०१८ मध्ये आयएएस ही नोकरी सोडून भाजपामध्ये सहभागी झाल्या. (@Aparajita Sarangi/FB)

  • 7/10

    त्यांनी बिहारमधील भागलपूर विद्यापीठामध्ये बीए इंग्लिश हे त्यांचे पदवीचे शिक्षण पूर्ण केले आहे. (@Aparajita Sarangi/FB)

  • 8/10

    त्यांच्या संपत्तीची माहिती जर आपण बघितली तर myneta. Info या वेबसाईट नुसार अपराजिता सारंगी ४ कोटी रुपयांच्या मालक आहेत. (@Aparajita Sarangi/FB)

  • 9/10

    त्यांच्या विविध बँक खात्यामध्ये १ कोटी २९ लाख ८६ हजार ११० रुपये रक्कम आहे. तसेच त्यांच्याकडे १ कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीचे सोन्याचे आणि चांदीचे दागिने आहेत. (@Aparajita Sarangi/FB)

  • 10/10

    अपराजिता सारंगी आणि त्यांचे पती यांच्या नावावर २ कोटी रुपयांची स्थावर मालमत्ता आहे. (@Aparajita Sarangi/FB)

TOPICS
ओडिशाOdishaभारतीय जनता पार्टीBJPमराठी बातम्याMarathi Newsलोकसभा निवडणूक निकाल २०२४ (Lok Sabha Election Result 2024)Lok Sabha Election

Web Title: Who is aparajita sarangi wins bhubaneswar lok sabha election name in odisha chief minister race net worth property assets and education spl

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.