• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • लाइफस्टाइल
  • विचारमंच
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • लोकसत्ता सविस्तर
  • लोकसत्ता प्रीमियम
  • Subscribe at Rs 699
  • नरेंद्र मोदी
  • QUIZ -महाराष्ट्र निवडणुका
  • देवेंद्र फडणवीस
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. elections gallery
  4. bihar assembly election close margin results radha charan sah biography and background jdu candidate victory by 27 votes aam

२७ मतांनी बिहार विधानसभा जिंकणारे राधा चरण साह कोण आहेत?

Radha Charan Sah: केंद्रीय निवडणूक आयोगाला दिलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार साह यांची एकूण संपत्ती ३४ कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे आणि त्यांचे वार्षिक उत्पन्न १.१ कोटी रुपये आहे.

November 15, 2025 20:28 IST
Follow Us
  • Radha Charan Sah biography and background
    1/9

    बिहार विधानसभा निवडणुकीची काल मतमोजणी पार पडली. यामध्ये एनडीएने २०० हून अधिक जागा जिंकत स्पष्ट बहुमत मिळवले आहे.

  • 2/9

    दुसरीकडे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या संयुक्त जनता दलाचे उमेदवार राधा चरण साह सध्या देशभरात चर्चेत आहेत. त्यांची देशभरात मोठ्या प्रमाणात चर्चा होण्याचे कारण म्हणजे त्यांनी २७ मतांच्या फरकाने मिळवलेला विजय.

  • 3/9

    भोजपूर जिल्ह्यातील संदेश विधानसभा मतदारसंघातील संयुक्त जनता दलाचे उमेदवार राधा चरण साह आणि लालू प्रसाद यादव यांच्या राष्ट्रीय जनता दलाचे प्रतिस्पर्धी दीपू सिंह यांच्यात अत्यंत चुरशीची लढत झाली.

  • 4/9

    काल सकाळी मतमोजणीच्या सुरुवातीच्या टप्प्यात राष्ट्रीय जनता दलाचे दीपू सिंह या जागेवरून आघाडीवर होते. पण संयुक्त जनता दलाचे राधा चरण साह यांनी हळूहळू पिछाडी भरून काढली आणि त्यानंतर राष्ट्रीय जनता दलाच्या उमेदवारावर आघाडी कायम ठेवली. दोन्ही उमेदवारांना मिळालेल्या मतांमध्ये खूपच कमी फरक असल्याने मतमोजणीच्या अंतिम फेरीपर्यंत या जागेवर चुरस निर्माण झाली होती.

  • 5/9

    अखेर २८व्या आणि मतमोजणीच्या अंतिम फेरीनंतर संयुक्त जनता दलाचे राधा चरण साह यांना विजयी घोषित करण्यात आले. त्यांना एकूण ८०,५९८ मते मिळाली, तर राष्ट्रीय जनता दलाच्या दीपू सिंह यांना ८०,५७१ मते मिळाली.

  • 6/9

    यामध्ये जनसुराज पक्षाचे उमेदवार राजीव रंजन राज ७४,००० पेक्षा जास्त मतांनी पिछाडीवर राहिले. आरा लोकसभा मतदारसंघात येणारी संदेश विधानसभा जागा यापूर्वी राष्ट्रीय जनता दलाकडे होती.

  • 7/9

    संयुक्त जनता दलाच्या सर्वात श्रीमंत उमेदवारांपैकी एक असलेले राधा चरण साह यापूर्वी बिहार विधान परिषदेचे सदस्य होते. ते एक उद्योगपतीदेखील आहेत. त्यांचे अनेक व्यवसाय आहेत. उल्लेखनीय म्हणजे, राजकारणात येण्यापूर्वी त्यांनी जिलेबी विकण्याचा व्यवसायही केला आहे.

  • 8/9

    केंद्रीय निवडणूक आयोगाला दिलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार साह यांची एकूण संपत्ती ३४ कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे आणि त्यांचे वार्षिक उत्पन्न १.१ कोटी रुपये आहे.

  • 9/9

    त्यांच्या प्रतिज्ञापत्रातून असेही समोर आले आहे की त्यांच्याविरुद्ध अनेक गुन्हेगारी खटले प्रलंबित आहेत. दोन वर्षांपूर्वी त्यांना मनी लाँड्रिंगच्या आरोपाखाली अंमलबजावणी संचालनालयाने अटक देखील केली होती. (All Photo: Radha Charan Sah)

TOPICS
जेडीयूJDUबिहार विधानसभा निवडणूक २०२५Bihar Election 2025

Web Title: Bihar assembly election close margin results radha charan sah biography and background jdu candidate victory by 27 votes aam

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.