-
सैराट चित्रपटाने कमाईचे नवे रेकॉर्ड केले आहे. आतापर्यंत या चित्रपटाने ८२ कोटीपर्यंतचा गल्ला जमवला आहे. या चित्रपटातील सर्व कलाकार सध्या प्रसिद्धीच्या शिखरावर आहेत. सैराट चित्रपटातील आर्चीच्या भूमिकेमुळे घराघरात पोहचलेली अभिनेत्री रिंकू राजगुरुने आता जाहिरात विश्वालाही याडं लावले आहे. (छाया सौजन्यः यूट्यूब)
-
रिंकूने नुकतेच ‘गो’ एडिबल ऑईल या खाद्यतेलाचे प्रॉडक्ट लाँच केले.
-
गजानन ग्रुपच्या ‘गो’ एडिबल ऑईल अर्थात खाद्यतेलाच्या ब्रँडचं उद्घाटन रिंकू राजगुरुच्या हस्ते करण्यात आलं.
-
या सोहळ्याला सुप्रसिद्ध संगीतकार जतिनही उपस्थित होते.
-
रिंकू राजगुरु
-
गजानन ग्रुपच्या ‘गो’ एडिबल ऑईल अर्थात खाद्यतेलाच्या ब्रँडचं उद्घाटन रिंकू राजगुरुच्या हस्ते करण्यात आलं.
-
रिंकू राजगुरुने ‘सैराट’ चित्रपटातील डायलॉग बोलून उपस्थितांची मनं जिंकली.
-
रिंकू राजगुरु
-
कॉमेडियन कपिल शर्माचा लोकप्रिय कार्यक्रम ‘द कपिल शर्मा शो’मध्ये महाराष्ट्रासह देशाला झिंगाट करून सोडणा-या सैराट चित्रपटाची टीम येणार आहे. दिग्दर्शक नागराज मंजुळेंसह चित्रपटातील कलाकार उपस्थित राहणार असल्याची माहिती आहे.
-
सोनी वाहिनीवरील ‘द कपिल शर्मा शो’ हा हिंदी सिनेमांचे प्रमोशन करण्यासाठी ओळखला जातो. सैराटची टीम येणार असल्यामुळे या शोमध्ये काय धम्माल पाहायला मिळणार याची उत्सुकता सर्वांना आहे.
-
‘सैराट’ सिनेमाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. या सिनेमाने आतापर्यंतच्या मराठी सिनेमांच्या कमाईचे सर्व रेकॉर्ड मोडीत काढले आहेत.
-
'सैराट’ चित्रपटाने आतापर्यंत ८० कोटींच्या वर गल्ला जमवला आहे.
-
गजानन ग्रुपच्या ‘गो’ एडिबल ऑईल अर्थात खाद्यतेलाच्या ब्रँडचं उद्घाटन रिंकू राजगुरुच्या हस्ते करण्यात आलं.
-
रिंकू राजगुरु
रिंकू राजगुरुचं जाहिरात विश्वालाही ‘याड लागलं’!
रिंकूने ‘सैराट’ चित्रपटातील डायलॉग बोलून उपस्थितांची मनं जिंकली.
Web Title: Sairat fame actoress rinku rajguru launch go edible oil product