Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • मनोज जरांगे पाटील
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. movie theaters in china reopened after 178 days from july 20 scsg

आधीसारखं काहीच नाही… १७८ दिवसांनंतर सुरु झाली चीनमधील चित्रपटगृहे; दिसून आले ‘हे’ बदल

२० जुलैपासून चीनमधील लो रिस्क भागातील चित्रपटगृहे सुरु झाली

Updated: September 10, 2021 14:23 IST
Follow Us
  • करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जगभरातील वेगवेगळ्या देशांमध्ये लागू करण्यात आलेल्या लॉकडाउनमुळे अनेक प्रश्न सर्वसामान्यांना पडले आहेत. सार्वजनिक सेवांवर परिणाम करणाऱ्या या लॉकडाउनसंदर्भातील सर्व प्रश्न थोड्याफार फरकाने सारखेच आहेत. याच प्रश्नांपैकी एक प्रश्न म्हणजे या पुढे चित्रपटगृहांमध्ये जाऊन कधी चित्रपट पाहता येतील? मात्र चीनमध्ये नुकतेच चित्रपटगृह पुन्हा सुरु करण्यात आले आहेत. त्यामुळेच तेथील जनतेला तरी आता हा प्रश्न पडणार नाही हे नक्की. जवळजवळ पाच महिन्यानंतर ही चित्रपटगृहे सुरु करण्यात आली असली तरी तेथील नजारा नेहमीसारखा नक्कीच नसल्याचे फोटोंमधून दिसून येत आहे. चला तर पाहुयात याच पोस्ट करोनाव्हायरस चित्रपटगृहांचे स्वरुप...(Photo: Twitter/ChinaDaily)
    1/20

    करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जगभरातील वेगवेगळ्या देशांमध्ये लागू करण्यात आलेल्या लॉकडाउनमुळे अनेक प्रश्न सर्वसामान्यांना पडले आहेत. सार्वजनिक सेवांवर परिणाम करणाऱ्या या लॉकडाउनसंदर्भातील सर्व प्रश्न थोड्याफार फरकाने सारखेच आहेत. याच प्रश्नांपैकी एक प्रश्न म्हणजे या पुढे चित्रपटगृहांमध्ये जाऊन कधी चित्रपट पाहता येतील? मात्र चीनमध्ये नुकतेच चित्रपटगृह पुन्हा सुरु करण्यात आले आहेत. त्यामुळेच तेथील जनतेला तरी आता हा प्रश्न पडणार नाही हे नक्की. जवळजवळ पाच महिन्यानंतर ही चित्रपटगृहे सुरु करण्यात आली असली तरी तेथील नजारा नेहमीसारखा नक्कीच नसल्याचे फोटोंमधून दिसून येत आहे. चला तर पाहुयात याच पोस्ट करोनाव्हायरस चित्रपटगृहांचे स्वरुप…(Photo: Twitter/ChinaDaily)

  • 2/20

    चीनमध्ये अगदी आयमॅक्ससारख्या मोठ्या चित्रपटगृहांपासून अगदी लहान चित्रपटगृहे सुद्धा २० जुलैपासून सुरु झाली आहेत(Photo: Twitter/WuxiCity)

  • 3/20

    ज्या चीनमधून करोनाचा उद्रेक झाला तिथे मागील पाच महिन्यांपासून चित्रपटगृह बंद होती. करोनाचा संसर्ग रोखण्यासाठी शाळा, कॉजेल, मॉल, मोठे बाजार आणि चित्रपटगृह बंद ठवण्यात आले होते. पाच महिन्यांच्या बंदीनंतर चीनमध्ये पहिल्यांदाच २० जुलैपासून चित्रपटगृहे सुरु करण्यात आली आहेत. मात्र ही परवानगी केवळ लो रिस्क भागातील चित्रपटगृहांना देण्यात आली आहे. (Photo: Twitter/SanyaofChina)

  • 4/20

    येणाऱ्या प्रत्येकाच्या शरीराचे तापमान तपासूनच त्याला चित्रपटगृहामध्ये प्रवेश दिला जातो. (Photo: Twitter/ChinaDaily)

  • 5/20

    पहिल्याच दिवशी अगदी तुफान प्रतिसाद नाही म्हटलं तरी उत्तर प्रतिसाद पहायला मिळाला. (Photo: Twitter/CGTNOfficial)

  • 6/20

    १७८ दिवसांनंतर चित्रपटगृहांमध्ये आल्यानंतर सेल्फी तो बनता है ना बॉस… (Photo: Twitter/CGTNOfficial)

  • 7/20

    चित्रपटगृहांच्या स्वच्छेतेची विशेष काळजी घेण्यात येत आहे. प्रत्येक शो नंतर थेअटर सॅनिटाइज केलं जातं आहे. (Photo: Twitter/ChinaAmbUN)

  • 8/20

    दोन प्रेक्षकांमध्ये अंतर ठेवण्यासाठी काही थेअटर्समध्ये अशाप्रकारे मोठ्या आकाराच्या बाहुल्यांचा वापर करण्यात आला आहे. (Photo: Twitter/CGTNOfficial)

  • 9/20

    तर काही जागी संपूर्ण रांगच बंद ठेवण्यासाठी अशाप्रकारे पट्ट्या लावण्यात आल्या आहेत. (Photo: Twitter/Echinanews)

  • 10/20

    काही ठिकाणी अशा प्रकारे प्रेक्षकांनाच लांब लांब बसण्यास सांगण्यात आलं आहे. (Photo: Twitter/SanyaofChina)

  • 11/20

    प्रत्येक सीट सॅनिटाइज केली जात आहे (Photo: Twitter/ChinaDaily)

  • 12/20

    अगदी एसीचे व्हेंट्स आणि छप्पर वगैरेच्या स्वच्छतेचीही विशेष काळजी घेतली जात आहे.(Photo: Twitter/ChinaDaily)

  • 13/20

    कमीत कमीत गोष्टींना स्पर्श करुन कसा कारभार करता येईल याला प्राधान्य देताना स्कॅनिंग, क्यूआरकोडसारख्या गोष्टींचा वापर अधिक प्रमाणात केला जात आहे. (Photo: Twitter/ChinaDaily)

  • 14/20

    अगदी कार्पेटपासून खुर्च्यांपर्यंत सर्व जागांवर वेळोवेळी फवारणी केली जाते. (Photo: Twitter/ChinaDaily)

  • 15/20

    अगदी चित्रपट गृहामधील हॅण्डल्सही डिसइन्फेक्टंटने साफ केले जात आहेत. (Photo: Twitter/Echinanews)

  • 16/20

    एअर प्युरिफायर आणि जंतुनाशकांची फवारणी केल्यानंतर पुढील शोच्या प्रेक्षकांना आतमध्ये प्रवेश देण्याआधी मधील कालावधी वाढवण्यात आला आहे. जंतुनाशकांचा आणि केमिकल्सचा त्रास होऊ नये म्हणून हा कालावधी वाढवण्यात आला आहे. (Photo: Twitter/Echinanews)

  • 17/20

    थ्री डी चित्रपटांसाठी वापरेल जाणारे ग्लासेसही सॅनिटाइज केले जात आहेत. (Photo: Twitter/Echinanews)

  • 18/20

    करोनाच्या पार्श्वभूमीवर अधिक कर्मचाऱ्यांना स्वच्छतेसंदर्भातील कामे देण्यात आली आहेत. (Photo: Twitter/CGTNOfficial)

  • 19/20

    अनेक ठिकाणी खाद्यपदार्थांची सोयही उपलब्ध करुन देण्यात आली असली तरी सुरक्षा आणि स्वच्छतेचे सर्व नियम पाळले जात आहेत. (Photo: Twitter/SanyaofChina)

  • 20/20

    एकंदरितच करोनानंतर चित्रपटगृहांचे स्वरुप खूपच बदललेले पहायला मिळत आहे. (Photo: Twitter/SanyaofChina)

TOPICS
करोना विषाणूCoronavirus

Web Title: Movie theaters in china reopened after 178 days from july 20 scsg

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.