• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • डोनाल्ड ट्रम्प
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. marathi actors sonalee kulkarni amey wagh subodh bhave swapnil joshi sidharth jadhav spending time with family in lock down kpw

कुणी बनलं शेफ.. तर कुणी केला व्यायाम.. कुटुंबासोबत कलाकारांचा आराम

कसा होता मराठी कलाकारांचा लॉकडाउन?

Updated: September 9, 2021 00:31 IST
Follow Us
  • लॉकडाउनला एक वर्ष पूर्ण होतंय. लॉकडाउनच्या काळात मराठी कलाकारांनी त्यांचा वेळ कसा घालवला हे पाहुयात.प्रिया बापट- अभिनेत्री प्रिया बापट लॉकडाउनच्या काळात सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय होती. याकाळात ती फिटनेसकडे जास्त लक्ष देताना दिसली. प्रियाने घरातच व्यायाम करण्याचं वेळापत्रक आखलं होतं. योगा आणि वर्क आउट करतानाचे फोटो शेअर करत ती चाहत्यांनादेखील फिटनेससाठी प्रोत्साहन देत होती.
    1/13

    लॉकडाउनला एक वर्ष पूर्ण होतंय. लॉकडाउनच्या काळात मराठी कलाकारांनी त्यांचा वेळ कसा घालवला हे पाहुयात.प्रिया बापट- अभिनेत्री प्रिया बापट लॉकडाउनच्या काळात सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय होती. याकाळात ती फिटनेसकडे जास्त लक्ष देताना दिसली. प्रियाने घरातच व्यायाम करण्याचं वेळापत्रक आखलं होतं. योगा आणि वर्क आउट करतानाचे फोटो शेअर करत ती चाहत्यांनादेखील फिटनेससाठी प्रोत्साहन देत होती.

  • 2/13

    उमेश कामत- अभिनेता उमेश कामत आणि प्रिया बापट म्हणजे मराठी सिनेसृष्टीतील क्यूट कपल. त्यामुळे प्रियाच्या जोडीलाच उमेशदेखील फिटनेसकडे लक्ष देत असल्याचं पाहायला मिळालं. कधी व्यायाम करताना कधी जेवण बनवताना तर कधी बुद्धीबळ खेळतानाचे फोटो शेअर करून उमेशने त्याचा लॉकडाउन कसा सुरु हे सांगितलं.

  • 3/13

    याच काळात प्रिया आणि उमेशने नवरा..बायको आणि लॉकडाउन हा व्हिडीओ घरात शूट केला. त्यांचा हा व्हिडीओ प्रचंड लोकप्रिय झाला.

  • 4/13

    तर अभिनेत्री सायली संजीव हिने अनेक दिवसांपासून तिची अपूर्ण असलेली पेटी शिकण्याची ईच्छा या काळात पूर्ण केली. सायलीने या काळात पेटी शिकण्याचे धडे घेतले. त्याचसोबत कधी चित्र काढण्यात तर स्वयंपाक करण्यात ती वेळ घालवायची. याचसोबत फिट राहण्यासाठी तिने योगावर भर दिला होता.

  • 5/13

    सर्वांचा ला़डका स्वप्नील जोशी याने लॉकडाउनमध्ये मिळालेला वेळ कुटुंबासोबत एऩ्जॉय केला. दोन्ही मुलांसोबत मजा मस्ती करण्याची संधी त्याला मिळाली. एमएक्स प्लेअरवर प्रदर्शित झालेली 'समांतर' ही वेब सीरिज चांगलीच गाजली.

  • 6/13

    अभिनेत्री सोनाली कुलकर्णीनने लॉकडाउच्या काळात 37 दिवसांचं फिटनेस चॅलेंज स्विकारलं होतं. या ३७ दिवसांच्या काळात, ती दिवसातून ४ तास वर्कआऊट करत होती. या दिवसांत तिने साखर खाणं पूर्णपणे बंद केलं. सकाळच्या वेळात, रिकाम्या पोटी हा व्यायाम करण्यावर तिने भर दिला. काही काळ ती होणारा नवरा कुणाल बेनोडेकरसोबत दुबईमध्ये राहत होती. यावेळी पुस्तक वाचन आणि किचनमध्ये प्रयोग करण्यात तिने स्वत:चा वेळ घालवला.

  • 7/13

    लॉकडाउनची घोषणा झाली तेव्हा अभिनेता अमेय वाघ नाटकाच्या प्रयोगासाठी अमेरिकेत गेला होता. लॉकडाउनच्या घोषणेनंतर तो भारतात परतला. त्यामुळे त्याला होम क्वारंटीन व्हाव लागलं होतं. या दरम्यान अमेयने अनेक व्हिडीओ शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न केला. या काळात अनेक विनोदी व्हिडीओ शेअर करत तो चाहत्याचं मनोरंजन करत होता. तसंच विविध वेब सीरिज पाहण्याला त्याने पसंती दिली.

  • 8/13

    अभिनेत्री प्राजक्ता माळी हिने आपल्या कुटुंबियांसोबत वेळ घालवला. प्राजक्ता या काळात सोशल मीडियावर चांगलीच अॅक्टीव होती. लाडक्या भाच्यांसोबत खेळण्यासाठी तिला लॉकडाउनमुळे वेळ देता आला. याशिवाय पुस्तक वाचन. बगिचाकाम करणं आणि योगा करताना ती दिसून आली.

  • 9/13

    मालिका तसचं सिनेसृष्टीतील कलाकार शूटिंगमध्ये कायम व्यस्त असतात. बऱ्याचदा त्यांना कुटुंबासोबत वेळ घालवणं शक्य होत नाही. मात्र लॉकडाउनमुळे या कलाकारांना कुटुंबियांना वेळ देता आला. लाकडाउनमध्ये सिद्धार्थ जाधवने त्याच्या दोन्ही मुलींसोबत धमाल करत वेळ घालवला. मुलींसोबत मजामस्ती करतानाचे काही व्हिडीओ त्याने इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.

  • 10/13

    करोनाचं संकट आणि लॉकडाउनच्या स्थितीतही अभिनेता सुबोध भावेने त्याच्या चाहत्यांचं मनोरंजन केलं. सुबोध भावेने या काळात बालमित्रांसाठी एक खास उपक्रम सुरु केला होता. सोशल मीडियावर सुबोध त्याच्या बालमित्रांना वेगवेगळ्या गोष्टी सांगायचा. सुबोध दादाची गोष्ट असं त्याच्या उपक्रमाचं नावं होतं.

  • 11/13

    अभिनेत्री रिंकू राजगुरु देखील लॉकडाउनच्या काळात सोशल मीडियावर सक्रिय होती. सोशल मीडियावरुन ती चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत होती. याशिवाय फिट राहण्यासाठी व्यायाम करणं तिने पसंत केलं.

  • 12/13

    तर अनेकांच्या लाडक्या वहिनीसाहेब यांनी या काळात किचनचा ताबा घेतला होता. धनश्री काडगावकरने वेगवेगळे पदार्थ बनवून त्याचे फोटो चाहत्यांसोबत शेअर केले. तसंच याच काळात तिला गोड बातमी मिळाली. ती म्हणजे नव्या पाहुण्याच्या आगमनाची. काही दिवसांपूर्वीच धनश्री आई झालीय.(photos- instagram)

  • 13/13

    अनेक मराठी सिनेमा तसचं हिंदी आणि मराठी मालिकांमधून घराघरात पोहचलेल्या अभिनेत्री निवेदिता सराफ यांनी लॉकडाउनमधील वेळ चांगलाच कामी लावला. निवेदिता सराफ यांच स्वत:च युट्यूब चॅनल असून त्यांनी याकाळात वेगवेगळ्या रेसिपी चाहत्यांसोबत शेअर केल्या.

TOPICS
बॉलिवूडBollywoodबॉलिवूड न्यूजBollywood News

Web Title: Marathi actors sonalee kulkarni amey wagh subodh bhave swapnil joshi sidharth jadhav spending time with family in lock down kpw

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.