-
स्टारकिड्स म्हटलं की प्रत्येकाला वाटतं की त्यांचे जीवनही ग्लॅमरस असेल आणि त्यांना त्यांच्या भविष्याचा विचार न करता जसे पाहिजे तसे आयुष्य जगता येते. त्याना उच्च शिक्षणाची गरज नाही असे देखील अनेकांना वाटते. मात्र, नव्या नवेली नंदा, जान्हवी कपूर, सारा अली खान आणि आर्यन खानसारखे अनेक स्टारकिड्स आहेत. एकतर हे उच्चशिक्षित आहेत किंवा त्यांना ज्या क्षेत्रात त्यांचे करिअर करायचे आहे त्याचे ते शिक्षण तरी घेत आहेत. चला तर जाणून घेऊया स्टारकिड्सच्या शिक्षणा बद्दल…
-
आर्यन खान – शाहरुख खान आणि गौरी खान यांचा मुलगा आर्यन खानने लंडनच्या सेव्हनॉक्स शाळेत त्याचे शालेय शिक्षण पूर्ण केले आहे. त्यानंतर आर्यन आता पदवी प्राप्त करण्यासाठी लॉस एंजेलिसच्या साऊर्थन कॅलिफोर्निया विद्यापीठात पुढचे शिक्षण घेत आहे. (Photo credit – aryan khan instagram)
-
नव्या नवेली नंदा – दिग्गज अभिनेते अमिताभ बच्चन यांची नात नव्या नवेली नंदाने लंडनमधील सेव्हनॉक्स स्कूलमध्ये शालेय शिक्षण घेतले आहेत. सध्या ती न्यूयॉर्क शहरातील फोर्डहॅम विद्यापीठातून उच्च शिक्षण घेत आहे. नव्याला चित्रपटसृष्टीत तीच करिअर करण्याची इच्छा नसून ती तिच्या वडीलांना कामात मदत करणार आहे. (Photo credit – navya naveli nanda)
-
जान्हवी कपूर – दिग्दर्शक बोनी कपूर आणि दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी यांची मुलगी जान्हवी कपूर ही लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. जान्हवीने 'धडक' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. जान्हवीने मुंबईतील धीरुभाई अंबानी आंतरराष्ट्रीय शाळेतून शालेय शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर जान्हवीने अमेरिकेतील ली स्ट्रासबर्ग थिएटर अॅंड फिल्म इन्स्टिट्यूट मधून अभिनयाचे धडे घेतले. (Photo credit – janhvi kapoor)
-
सारा अली खान – अभिनेता सारा अली खान आणि अभिनेत्री अमृता सिंग यांची थोरली आणि एकलुती एल मुलगी सारा. साराने कोलम्बिया विद्यापीठातून पदवीधर शिक्षण घेतले आहे. (Photo credit – sara ali khan instagram)
-
सुहाना खान – अभिनेता शाहरूख खान आणि गौरी खानची मुलगी सुहाना आहे. सुहानाने तिचे शालेय शिक्षण हे मुंबईतील धीरूभाई अंबानी आंतरराष्ट्रीय शाळेतून शालेय पूर्ण केले आहे. इंग्लंडच्या आर्डलींग कॉलेजमधून सुहानाने पुढचे शिक्षण घेतले आहे. तर, आता सुहाना न्यूयॉर्क विद्यापीठातून अभिनयात पदवी मिळवण्यासाठी गेली आहे. (Photo credit – suhan khan instagram)
-
इब्राहिम अली खान- इब्राहिम अली खान हा अभिनेता सैफ अली खान आणि अभिनेत्री अमृता सिंगचा मुलगा आहे. इब्राहिम अली खानने मुंबईतील धीरूभाई अंबानी आंतरराष्ट्रीय शाळेतून शालेय शिक्षण पूर्ण केले आहे. त्यापुढचे शिक्षण तो इंग्लंडमध्ये घेते आहे. (Photo credit – sara ali khan instagram)
-
अनन्या पांडे – चंकी पांडेची थोरली मुलगी अनन्या पांडे आहे. अनन्याने मुंबईतील धीरूभाई अंबानी आंतरराष्ट्रीय शाळेतून शिक्षण पूर्ण केले आहे. (Photo credit – ananya pandey instagram)
-
अलाया फर्नीचरवाला – अलायाने २०२०मध्ये सैफ अली खानच्या 'जवानी जानेमन' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. अलाया अभिनेत्री पूजा बेदीची मुलगी आहे. लंडन फिल्म अॅकॅडमीमधून अलायाने फिल्म आर्ट्सचे शिक्षण पूर्ण केले आहे. (Photo credit – alaya f instgram)
-
अहान शेट्टी – अहान शेट्टी हा सुनील शेट्टी यांचा मुलगा आहे. अहानने त्याचे अभिनयाचे धडे आणि चित्रपट निर्मितीचे शिक्षण अमेरिकेतील एका विद्यापीटातून पूर्ण केले. अहान लवकरच अभिनेत्री तारा सुतारीया सोबत 'तडप' या चित्रपटात दिसणार आहे. (Photo credit – ahan shetty instagram)
सारा, जान्हवी ते आर्यन या बॉलिवूड स्टारकिड्सचे शिक्षण माहित आहे का?
Web Title: A look at educational qualifications of popular star kids navya naveli nanda aryan khan suhana khan ibrahim ali khan alaya f ahan shetty sara ali khan janhvi kapoor dcp