-
बॉलिवूडचा प्रसिद्ध दिर्गर्शक आणि निर्माता करण जोहर सोशल मीडियावर चांगलाच सक्रिय असतो. अनेकदा करण त्याच्या जुळ्या मुलांचे क्यूट फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत असतो.
-
नुकतेच करणने त्याची मुलगी रुही आणि यश यांचे क्यूट फोटो त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केले आहेत. हे फोटो शेअर करत त्याने पावसाची तयारी करत असल्याचं म्हंटलं आहे.
-
करण जोहरने मुलगी रुहीचा रेनकोट घातलेला एक फोटो शेअर केलाय. यात रेन कोट घातल्याचा आनंद रुहीच्या चेहऱ्यावर झळकतोय.
-
तर मुलगा यशचा देखील त्याने रेनकोटमधील फोटो शेअर केलाय. यश आणि रुही दोघांनी सारखेच रेनकोट घातल्याचं या फोटोत दिसतंय. "पावसाळ्याची तयारी" असं कॅप्शन करणने या फोटोंना दिलंय.
-
करणने शेअर केलेल्या या फोटोवर अभिनेता रितेश देशमुखने " किती गोड" अशी कमेंट केली आहे. त्याचसोबत डिझायनर मनिष मल्होत्रा, सोनाली बेंद्र अशा अनेक सेलिब्रिटींनी या फोटोंना पसंती दिलीय.
-
या आधी करणने रुही आणि यशचा लाईफ जॅकेटमधील एक फोटो शेअर केला होता.
-
२०१७ साली सरोगसीच्या माध्यमातून यश आणि रुहीचा जन्म झाला आहे.(all photos-instagram@karanjohar)
“पावसाळ्याची तयारी!”; करण जोहरने शेअर केले मुलांचे क्यूट फोटो
पहा फोटो
Web Title: Karan johar share cute photo of ruhi and yash said prepping for the monsoons kpw