-
पाकिस्तानने या आधी दोन वेळा टिकटॉक अॅपवर बंदी आणली आणि ती पुन्हा हटवली. पाकिस्तान टेलीकम्युनिकेशन अथॉरिटी (PTA) ने टिकटॉक अॅप सेन्सॉर करण्यासाठी नव्या पद्धतीचा अवलंब सुरु केला आहे. यानुसार ठराविक व्यक्तीच्या अकाऊंटवर बंदी आणली जाते. यातच आता एक्स पॉर्न स्टार मिया खलिफाच्या टिकटॉक अकाऊंटवर बंदी आणली आहे.
-
कोणतीही अधिकृत घोषणा न करता पीटीएने मिया खलिफाचं अकाऊंट बंद केलं आहे. या मागचं कोणतही कारण पीटीएने स्पष्ट केलेलं नाही.
-
मियाचं अकाऊंट बंद झाल्यानंतर तिच्या चाहत्यांनी ट्विटरवर गोंधळ घातला. मियाच्या टिकटॉक अकाऊंटवर कंन्टेट न दिसल्याने त्यांनी ट्विटवरुन प्रश्न उपस्थित केले. त्यानंतरच मियाला
-
अकाऊंट बंद झाल्यानंतर मियाने ट्विटरवरुन एक ट्विट करत प्रतिक्रिया दिली आहे. "माझ्या टिकटॉक अकाऊंटवर देशात बंदी घातल्याने पाकिस्तानबद्दल आवाज उठवला पाहिजे. माझे सर्व टिकटॉक व्हिडीओ मी चाहत्यांसाठी ट्विटरवर शेअर करत आहे." अशा आशयाचं ट्विट मियाने केलंय.
-
तर मियाच्या या ट्विटला अनेकांनी समर्थन देत पीटीएच्या कारवाईवर आक्षेप घेतलाय.
-
सोशल मीडियावरुन मिय़ाला अनेक नेटकऱ्यांनी पाठिंबा दिला आहे. पाकिस्तान सरकार इतर महत्वाच्या मुद्द्यांकडे दुर्लक्ष करत मियाच्या बंदीकडे जास्त लक्ष देत असल्याचा आरोप अनेक नेटकऱ्यांनी केला आहे.
-
देश विदेशातील अनेक घडामोडींवर या आधी मिया खलिफाने सोशल मीडियावर तिचं मत व्यक्त केलं आहे. (all photo-instagram@miakhalifa)
पाकिस्तानमध्ये मिया खलिफाच्या टिकटॉक अकाऊंटवर बंदी; पाक सरकारवर पॉर्न स्टार संतापली
पहा फोटो
Web Title: Porn star mia khalifa tiktok account banned in pakistan as she get angrry on pakistan goverment kpw