-
अभिनेत्री श्रुती मराठी सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय आहे. वेगेवगळे फोटो शूट करत ती चाहत्यांचं लक्ष वेधून घेत असते. राज्यात पावसाला सुरुवात झालीय. पावसाळा आला की अनेक सेलिब्रिटी खास पावसात भिजण्याचा आनंद घेत फोटोशूट करताना दिसतात. असाच मोह श्रुतीला झाल्याचं दिसतंय. श्रुतीने नुकतेच तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर काही नवे फोटो शेअर केले आहेत.
-
श्रुती मराठेने शेअर केलेले हे खास फोटो सध्या अनेकांचं लक्ष वेधून घेत आहेत. पावसासारख्या रोमॅण्टिक वातावरणात श्रुतीने पावसाची मजा घेत हे फोटोशूट केलंय.
-
कोणतेही ग्लॅमरस कपडे परिधान न करता श्रुतीने साडी नेसल्याचं या फोटोत दिसून येतंय. यात ती पावसात भिजताना दिसतेय.
-
या फोटमधील श्रुतीची भेदक नजर नेटकऱ्यांना घायाळ करतेय. सौदर्य आणि मादकता याची केमिस्ट्री या फोटोंमध्ये दिसून येतेय.
-
या फोटोंना श्रुतीने खास कॅप्शनही दिलंय." कभी बेपनाह बरस पड़ी..कभी गुम सी हैं..ये बारिश भी कुछ कुछ..तुम सी है ।"
-
श्रुती मराठेच्या या फोटोला अनेक चाहत्यांनी पसंती दिली आहे. त्याचसोबत अभिनेत्री संसकृती बालगुडे आणि ऋजुता बागवे यांनी देखील कमेंट करत श्रुतीच्या फोटोला पसंती दिलीय.(All Photo- instagram@shrumarathe)
पाऊस..साडी आणि तिची भेदक नजर; श्रुती मराठेच्या मनमोहक अदा
सौदर्य आणि मादकता याची केमिस्ट्री श्रुती मराठेच्या फोटोत दिसून येतेय.
Web Title: Shruti marathe bold photo in saree enjoying rain share on instagram goes viral kpw