• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • वाचक सर्वेक्षण
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • माणिकराव कोकाटे
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. from ram kapoor divyanka tripathi hina khan sharad kelkar to nia sharma and deepika sing know educational qualification of tv star kpw

अभिनयातच नव्हे तर अभ्यासातही ‘या’ लोकप्रिय कलाकारांनी मारलीय बाजी, शिक्षण ऐकून व्हाल थक्क!

टेलिव्हिजनवरील या लोकप्रिय कलाकारांचं शिक्षण माहित आहे का?

June 15, 2021 17:07 IST
Follow Us
  • अभिनय करणं हे देखील काही सोपं काम नाही. प्रत्येक भूमिकेचा आभ्यास करुन त्या भूमिकेला योग्य न्याय देण्यासाठी कलाकारांची मेहनत पणाला लागते. टेलिव्हिजनवरील अनेक कलाकार त्यांच्या भूमिकांच्या माध्यमातून रोजच घराघरात जात असतात. या कलाकाराच्या खासगी आयुष्याबद्दल जाणून घेण्यासाठी अनेकजण उत्सुक असतात. आज आपण टेलिव्हिजनवरील काही लोकप्रिय कलाकारांचं नेमकं शिक्षण किती हे जाणून घेणार आहोत. यातील काही कलाकारांनी तर मालिकांसोबतच बॉलिवूड सिनेमांमधूनही चाहत्यांची पसंती मिळवली आहे.
    1/11

    अभिनय करणं हे देखील काही सोपं काम नाही. प्रत्येक भूमिकेचा आभ्यास करुन त्या भूमिकेला योग्य न्याय देण्यासाठी कलाकारांची मेहनत पणाला लागते. टेलिव्हिजनवरील अनेक कलाकार त्यांच्या भूमिकांच्या माध्यमातून रोजच घराघरात जात असतात. या कलाकाराच्या खासगी आयुष्याबद्दल जाणून घेण्यासाठी अनेकजण उत्सुक असतात. आज आपण टेलिव्हिजनवरील काही लोकप्रिय कलाकारांचं नेमकं शिक्षण किती हे जाणून घेणार आहोत. यातील काही कलाकारांनी तर मालिकांसोबतच बॉलिवूड सिनेमांमधूनही चाहत्यांची पसंती मिळवली आहे.

  • 2/11

    अभिनेता करण सिंह ग्रोवरने हॉटेल मॅनेजमेंटचं शिक्षण पूर्ण केलंय. मुंबई येथील प्रतिष्ठित इन्स्टिट्यूटमधून त्याने हॉटेल मॅनेजमेंटची ड्रीग्री मिळवली आहे. (photo-instagram@iamksgofficial)

  • 3/11

    'दिया और बाती हम' फेम अभिनेत्री दीपिका सिंहने बिझनेस अ‍ॅडमिनिस्ट्रेशनचं शिक्षण पूर्ण केलंय. यात तिने मार्केटिंगमध्ये स्पेशलायझेशन केलंय.पंजाब टेक्निकल युनिव्हर्सिटीतून तिने शिक्षण घेतलंय. (photo-instagram@deepikasingh150)

  • 4/11

    'कबुल है' फेम अभिनेत्री सुरभी ज्योतीने जालंधरमधील अपीजय कॉलेज ऑफ फाइन आर्ट्स इथून इंग्रजी विषयामध्ये मास्टर्स पूर्ण केलं आहे. (photo-instagram@surbhijyoti)

  • 5/11

    तर नुकत्याच रिलीज झालेल्या 'द फॅमिली मॅन-२' वेब सीरिजमध्ये अरंविदची भूमिका साकारणारा अभिनेता शरद केळकरने ग्वाल्हेरमध्ये त्याचं शिक्षण पूर्ण केलंय. शरदने एका प्रतिष्ठित विद्यापीठातून मार्केटिंगमध्ये एमबीए पूर्ण केलं आहे. (photo-instagram@sharadkelkar)

  • 6/11

    श्रीनगमध्ये जन्म झालेल्या अभिनेत्री हिना खानने दिल्लीमध्ये तिचं एमबीएचं शिक्षण पूर्ण केलंय. (photo-instagram@realhinakhan)

  • 7/11

    तर मालिकांसोबत अनेक बॉलिवूड सिनेमांधून आपली ओळख निर्माण करणाऱ्या अभिनेता राम कपूरने त्याचं भारतातील शिक्षण पूर्ण झाल्यानंतर अमेरिका गाठली. लॉस अँजेलस इथं राम कपूरने अभिनयाचं शिक्षण घेतलं.(photo-instagram@iamramkapoor)

  • 8/11

    तर अभिनेत्री दिव्यांका त्रिपाठीने रायफल शूटिंगमध्ये अनेक पदकं जिंकली आहेत. दिव्यांकाने उत्तरकाशीतील नेहरू इन्स्टिट्यूट ऑफ माउंटेनियरिंगमधून पर्वतारोहणाचा अभ्यासक्रमही पूर्ण केलाय. एका वृत्तानुसार अभिनय क्षेत्रात येण्यापूर्वी दिव्यांका स्पर्धा परिक्षांची तयारी करत होती. (photo-instagram@divyankatripathidahiya)

  • 9/11

    अभिनेत्री नेहा शर्मा म्हणजेच निया शर्माने दिल्लीमधील जगन्नाथ इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट इथून मास कम्युनिकेशनची पदवी प्रात्प केली आहे. (photo-instagram@niasharma90)

  • 10/11

    अभिनेत्री मौनी रॉयने दिल्लीमधील मिरांडा विद्यापीठातून इंग्रजी साहित्यातील पदवी प्राप्त केली आहे. त्यानंतर तिने मास कम्युनिकेशनचा कोर्स पूर्ण केलाय.(photo-instagram@imouniroy)

  • 11/11

    'ये है मोहब्बते' फेम अभिनेता करण पटेल याने लंडन स्कूल ऑफ आर्ट्समधून पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलंय.(photo-instagram@karan9198)

TOPICS
बॉलिवूडBollywoodमनोरंजन बातम्याEntertainment Newsहिंदी चित्रपटHindi Film

Web Title: From ram kapoor divyanka tripathi hina khan sharad kelkar to nia sharma and deepika sing know educational qualification of tv star kpw

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.