-
बिग बॉस १४ फेम राहुल वैद्य आणि त्याची गर्लफ्रेण्ड दिशा परमार यांचा विवाहसोहळा अखेर पार पडला.
-
दिशा आणि राहुलच्या वैवाहिक जीवनाला सुरुवात झालीय. राहुल दिशाच्या लग्न सोहळ्यातील अनेक फोटो आणि व्हिडीओ सध्या सोशल मीडिया तुफान व्हायरल होत आहेत.
-
राहुल वैद्य आणि दिशा परमार यांच्यात अनेक वर्षांपासून मैत्री होती. मात्र ‘बिग बॉस’ च्या १४व्या पर्वात राहुलने दिशा परमारला प्रपोज केलं होतं. यावर दिशा परमारने देखील तिचा होकार दिला होता.
-
राहुलने दिशाच्या वाढदिवसाच्या दिवशी एका पांढऱ्या रंगाच्या टीशर्टवर लिपस्टिकने ‘माझ्याशी लग्न करशील का’ असं लिहित टेलिव्हिजनवरून दिशाला प्रपोज केलं होतं. त्यानंतर व्हॅलेंटाइन्स डेला शोमध्ये येऊन दिशाने राहुलच्या प्रपोजला होकार दिला होता.
-
लग्नासाठी दिशाने खास लाल रंगाचा लेहंगा परिधान केलाय.
-
तर राहूल वैद्यने मोती कलरची शेरवानी परिधान करत फेटा बांधला आहे.
-
दिशाने लाल रंगाच्या लेहंग्यांवर हेवी नेकलेस घातला आहे. या भरजरी लेहंग्यात दिशा खूपच सुंदर दिसतेय.
-
दिशा आणि राहुलच्या लग्नातील फोटोंना चाहच्यांची मोठी पसंती मिळताना दिसतेय.
-
लग्न सोहळ्यासाठी दिशाचा खास लूक.
-
लग्नासाठी तयार होताना दिशा परमार.
-
सेलिब्रिटींसह अनेक चाहत्यांनी राहुल वैद्य आणि दिशा परमारला लग्नाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. (All Photo- instagram@israniphotography)
राहुल वैद्य आणि दिशा परमारच्या लग्न सोहळ्यातील खास फोटो
सोशल मीडियावर राहुल आणि दिशाच्या लग्नातील अनेक फोटो आणि व्हिडीओ व्हायरल झाले आहेत.
Web Title: Big boss fame rahul vaidya disha parmar wedding viral photos kpw