-
अमृता देशमुख-अभिषेक देशमुख : 'फ्रेशर्स' या मालिकेत परीची भूमिका साकारेली अमृता देशमुख आणि ‘आई कुठे काय करते’ मालिकेतील यशची भूमिका साकारणारा अभिषेक देशमुख हे दोघेही सख्खे भाऊ-बहिणी आहेत. हे दोघेही मुळचे पुण्याचे असून त्यांनी शिक्षण देखील पुण्यातच पूर्ण केलंय. अभिषेकची बहिण अमृता सध्या सोनी मराठीवरील 'मी तुझीच रे' मालिकेत काम करतेय.
-
खुशबु तावडे- तितिक्षा तावडे : 'तू अशी जवळी रहा' या मालिकेतून घराघरांत पोहोचलेली तितिक्षा तावडे ही खुशबु तावडेची सख्खी बहिण आहे. खुशबू तावडे ही गेल्या अनेक वर्षांपासून मालिका विश्वात काम करतेय. नुकतंच ती झी युवावरील 'आम्ही दोघी' या मालिकेत झळकली होती. तिने मराठीसोबतच हिंदी मालिकांमध्ये सुद्धा काम केलंय. या दोघींनीही डोंबिवलीत आपलं शिक्षण पूर्ण केलंय.
-
संदेश कुलकर्णी-सोनाली कुलकर्णी: हे दोघे बहिण-भाऊ त्यांच्या कॉलेजपासूनच अभिनय करत आहेत. सोनाली कुलकर्णीने आज मराठी फिल्म इंडस्ट्रीत स्वतःची एक वेगळी ओळख तयार तर केलीच आहे. पण संदेश कुलकर्णीने देखील मालिका, नाटक आणि सिनेमांमध्ये काम केलंय. 'एका लग्नाची तिसर गोष्ट' या मालिकेत तो झळकला होता. अभिनयाप्रमाणेच त्याने अनेक नाटकांचं संवाद लेखन केलंय.
-
मृण्मयी गोडबोले-सह्रद गोडबोले : ही बहिण-भावांची जोडी सुद्धा मराठी फिल्म इंडस्ट्रीत बरीच चर्चेत येत असते. मृण्मयीने अनेक नाटक आणि सिनेमांमध्ये काम केलंय. मात्र, 'अग्नीहोत्र' या मालिकेत तिने साकारलेली भूमिका आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहे. तिचा भाऊ सह्रदने सुद्धा अभिनयासोबत निर्मीती क्षेत्रात काम केलंय.
-
मृण्मयी देशपांडे-गौमती देशपांडे: या बहिणींची जोडी मराठी सिनेसृष्टीत लाडक्या भावंडांच्या यादीत पाहिली जाते. मृण्मयी आणि गौतमी या दोघी सख्ख्या बहिणी आहेत. मृण्मयीने 'कुंकू', 'अग्नीहोत्र' मालिकेनंतर चित्रपटांमध्ये सुद्धा झळकली. बहिण मृण्मयीपाठोपाठ गौतमीने सुद्धा अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं. सोनी मराठीवरील 'सारे तुझ्याचसाठी' ही तिची पहिली मालिका आहे. ही एक उत्तम गायिका सुद्धा आहे. तर मृण्मयी कथ्थक नृत्यप्रकारात पारंगत आहे.
-
वंदना गुप्ते-भारती आचरेकर: या दोघांना मराठी सिने इंडस्ट्रीतील सिनियर बहिणींची जोडी म्हणून ओळखलं जातं. या दोघीही सख्ख्या बहिणी आहेत. या दोघींनीही मालिका-सिनेमांमध्ये काम करत आपली वेगळी ओळख निर्माण केलीय. या दोघीही उत्तम गायिका सुद्धा आहेत. वंदना गुप्ते यांचं 'हरवलेल्या पत्त्यांचा बंगला' हे नाटक नुकतंच रंगभूमीवर आलं. तर भारती आचरेकर यांनी काही चित्रपटांमध्ये काम केलंय.
-
पूर्णिमा तळवलकर-पल्लवी वैद्य: या दोघी बहिणींची जोडी सुद्धा खूप गाजली. या दोघीही सख्ख्या बहिणी असून त्यांचं माहेरचं आडनाव भावे आहे. पूर्णिमा हिने दिवंगत अभिनेत्री स्मिता तळवलकर यांच्या पुतण्याशी लग्न केलं. तर पल्लवीने दिग्दर्शक केदार वैद्यसोबत लग्न केलं. पूर्णिमा याआधी 'होणार सून मी…' आणि 'फुलपाखरू' या मालिकेत झळकली होती. तर पल्लवी झी मराठीवरील 'स्वराज्यरक्षक संभाजी' या मालिकेत झळकली.
-
भार्गवी चिरमुले-चैत्राली गुप्ते : या दोघी सख्ख्या बहिणी असून भार्गवीने 'मोलकरीण' आणि 'वहिनीसाहेब' या मालिकेत काम केलंय. तर चैत्राली सध्या स्टार प्लस वाहिनीवरील 'ये रिश्ता क्या कहलाता है' मालिकेत काम करतेय.
-
अनुषा दांडेकर-शिबानी दांडेकर : या दोघा बहिणींची जोडी मराठी सिनेसृष्टीत ग्लॅमरस बहिणींची जोडी म्हणून ओळखल्या जातात. या दोघींनी आणखी एक बहिण असून अपेक्षा असं तिचं नाव असून ती एक संगीतकार आहे. अनुषाने यापूर्वी 'जय जय महाराष्ट्र माझा' आणि 'लालबाग परळ' या चित्रपटात काम केलंय. तर शिवानीला 'टाइमपास' चित्रपटातील आयटम सॉंग 'ही पोरी साजुक तुपातली'साठी ओळखलं जातं. याव्यतिरिक्त तिने 'संघर्ष' चित्रपटात देखील काम केलंय.
-
अभिनय बेर्डे – स्वानंदी बेर्डे : दिवंगत अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे यांची मुलं अभिनय बेर्डे आणि स्वानंदी बेर्डे. हे दोघं भाऊ बहीण खास बाँड शेअर करतात. ‘ती सध्या काय करते’ या चित्रपटातून पदार्पण केलेल्या अभिनयच्या प्रत्येक कौतुक सोहळ्यात स्वानंदी हजेरी लावते. स्वानंदी सोशल मीडियाद्वारे बरीच ॲक्टिव्ह असते. ती देखील लवकरच चित्रपटसृष्टीत पदार्पण करत असल्याचे समजते आहे.
Raksha Bandhan 2021: : ‘ही’ मराठी कलाकार आहेत ‘सेलिब्रिटी भावंडं’
ज्यांना आपण कलाकार म्हणून अनेकदा वेगवेगळ्या मालिका-चित्रपटात तर पाहतच असतो. मात्र काही कलाकार हे त्यांचे रिअल लाइफमध्ये बहीण-भाऊ सुद्धा आहेत, जे खूप कमी जणांना माहित असेल. चला जाणून घेऊयात….
Web Title: Real life celebrity siblings celebrity brothers sisters mrunmayi deshopande titiksha tawade abhishek deshmukh prp