-
अभिनेता अभय देओल हा हटके भूमिका साकारणारा आणि साचेबद्ध अभिनयाऐवजी वेगवेगळे प्रयोग करणारा अभिनेता म्हणून ओळखला जातो.
-
‘जिंदगी मिलेगी न दोबारा’, ‘देव डी’सारख्या अनेक चित्रपटांमध्ये त्याच्या भूमिकांचं कौतुक झाल्याचं आपल्याला पहायला मिळालं आहे.
-
‘चॉपस्टीक्स’, ‘जेएल ५०’सारख्या केवळ इंटरनेटवर प्रदर्शित झालेल्या चित्रपटांमधील त्याच्या भूमिका हटकेच ठरल्या. त्या प्रेक्षकांनाही तितक्याच आवडल्या.
-
अभय देओल सोशल नेटवर्किंगवरही फार चर्चेत असतो. अनेकदा सोशल नेटवर्किंगवरुन तो आपले मुद्दे रोखठोकपणे मांडताना दिसतो.
-
अभय देओलला सोशल नेटवर्किंगवर आपल्या खासगी आयुष्यातील गोष्टी शेअर करायला आवडत नाही.
-
अभय देओल हा प्रीति देसाईसोबत फार काळापासून रिलेशनशिपमध्ये होता.
-
मध्यंतरी अभय आणि प्रीतिचं ब्रेकअप झालं. त्यानंतर आता अभयच्या आयुष्यात नवीन तरुणी आल्याचं सांगितलं जात आहे.
-
अभयने शिलो शिव सुलेमानसोबत काही मादत फोटो शेअर केले आहेत.
-
या फोटोंमुळेच दोघे रिलेशनशिपमध्ये असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
-
अभयने शेअर केलेल्या फोटोंमध्ये तो शिलो शिव सुलेमानचे चुंबन घेताना आणि तिच्या गालाजवळ तोंड ठेऊन पोज देताना दिसत आहे.
-
अभयने शिलो शिव सुलेमानसोबतच्या या फोटोंना दिलेली कॅप्शनही फार चर्चेत आहे. पण त्याआधी ही शिलो नावाची तरुणी आहे तरी कोण ते पाहूयात.
-
शिलो ही एक ट्रायबल आर्टीस्ट म्हणजेच आदिवसी कलांमध्ये पारंगत असणारी कलाकार आहे.
-
शिलो ही सोशल नेटवर्किंगवर प्रचंड सक्रीय असून ती वेळोवेळी साचेबद्ध विचारसणीला छेद देणाऱ्या पोस्ट शेअर करत असते.
-
शिलो ही जगभरामध्ये तिच्या हटके कलाकृतींसाठी ओळखली जाते.
-
इन्स्टाग्रामवरुन ती अनेकदा तिचे फोटो पोस्ट करत असते. तिने मांडलेल्या विचारांशी अनेकजण सहमत असल्याचं दिसून येतं.
-
इन्स्टाग्रामवर शालोचे ५० हजारांहून अधिक फॉलोअर्स असून आता अभयने तिच्या सोबतचा फोटो शेअर केल्याने ती चर्चेत आलीय.
-
या फोटोंना कॅप्शन देताना अभयने ‘फ्री, फॉलोइंग, क्रिएटिव, फन, निडर, शांत और टॅलेंटेड, सेन्सुअल, सेक्सी…. ओह शिलोमध्ये या सर्वच घोष्टी आहेत,” असं म्हटलंय.
-
यावर शिलोने रिप्लाय करताना आणखीन अॅडव्हेंचर बाकी असल्याचं म्हटलं आहे.
‘या’ मुलीवर जडला अभय देओलचा जीव? Sexy असा उल्लेख करत शेअर केलेल्या मादक फोटोंवर ‘तिने’ केली कमेंट
अभय देओलला सोशल नेटवर्किंगवर त्याच्या खासगी आयुष्यातील गोष्टी शेअर करायला आवडत नाही. पण त्याने शेअर केलेले हे फोटो सध्या चर्चेत आहेत.
Web Title: Abhay deol shared photo with shilo shiv suleman scsg