Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. know the reason behind using word wood in major film industries like hollywood bollywood tollywood nrp

‘हॉलिवूड’सह ‘बॉलिवूड’ आणि ‘टॉलिवूड’मध्ये ‘या’ कारणासाठी केला जातो ‘वूड’ शब्दाचा वापर; जाणून घ्या खास कनेक्शन

सिनेसृष्टीत ‘वूड’ हा शब्द नेमका कुठून आला? त्याची सुरुवात नेमकी कुठून झाली? याचे उत्तर आज आपण जाणून घेणार आहोत.

Updated: November 9, 2021 18:58 IST
Follow Us
  • movies
    1/21

    दरवर्षी अनेक चित्रपटांची निर्मिती केली जाते. ते वेगवेगळ्या भाषेत बनवले जातात.

  • 2/21

    चित्रपट निर्मिती हा जगातील सर्वात मोठा व्यवसाय मानला जातो.

  • 3/21

    जगभरातील लाखो कोट्यावधी लोक या व्यवसायाशी प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरित्या जोडले आहेत.

  • 4/21

    भारतातील ‘बॉलिवूड’ इंडस्ट्री ही जगातील सर्वात मोठ्या चित्रपट उद्योगांपैकी एक मानली जाते.

  • 5/21

    ‘बॉलिवूड’ इंड्रस्टीचे एकूण मूल्य जवळपास १८३ अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त आहे.

  • 6/21

    भारतासह जगभरात सिनेसृष्टीला विविध नावे देण्यात आली आहे.

  • 7/21

    ‘हॉलिवूड’, ‘बॉलिवूड’, ‘टॉलीवूड’ या नावाने सिनेसृष्टीला ओळखले जाते.

  • 8/21

    भारतातील विविध भाषांमधील सिनेसृष्टी ही ‘बॉलिवूड’, ‘कॉलिवूड’, ‘लॉलिवूड’ आणि ‘टॉलिवूड’ अशा नावाने प्रसिद्ध आहे.

  • 9/21

    पण सिनेसृष्टीशी संबंधित असलेल्या या शब्दांमध्ये ‘वूड’ हा शब्द का वापरला जातो? यामागचे नेमके कारण का? याचा तुम्ही कधी विचार केलाय का? मग चला जाणून घेऊ.

  • 10/21

    सिनेसृष्टीत ‘वूड’ हा शब्द नेमका कुठून आला? त्याची सुरुवात नेमकी कुठून झाली? याचे उत्तर आज आपण जाणून घेणार आहोत.

  • 11/21

    ‘वूड’ हा शब्द मुख्यत्वे ‘हॉलिवूड’, ‘बॉलिवूड’, ‘टॉलिवूड’ यासारख्या सिनेसृष्टीत वापरला जातो. याची सुरुवात ‘हॉलिवूड’पासून झाली होती.

  • 12/21

    एच. जे. विटले (H.J. Whitley)यांना हॉलिवूड फिल्म इंडस्ट्रीचे जनक म्हणून ओळखले जाते. त्यांनीच ‘हॉलिवूड’ चित्रपटांची सुरुवात केली होती.

  • 13/21

    ‘हॉलिवूड’ या नावामागे एक रंजक कथा सांगितली जाते.

  • 14/21

    अमेरिकेतील लॉस एंजेलिस या शहराच्या मध्यवर्ती भागात वसलेल्या ‘हॉलिवूड’ नावाचा एक जिल्हा आहे. या जिल्ह्याच्या नावावरुन एच. जे यांनी या इंडस्ट्रीला नाव दिले होते.

  • 15/21

    त्यानंतर इतर चित्रपट इंडस्ट्रीने याच नावातील ‘वूड’ हा शब्द फॉलो करत सिनेसृष्टीला विविध नावे दिली.

  • 16/21

    यात ‘बॉलिवूड’, ‘टॉलिवूड’, ‘कॉलिवूड’, ‘लॉलीवूड’, ‘सँडलवूड’ यासारख्या अनेक राज्यातील सिनेसृष्टीतील नावांचा समावेश होतो.

  • 17/21

    हिंदी सिनेसृष्टीला ‘बॉलिवूड’ या नावाने ओळखले जाते. मुंबई किंवा बॉम्बे हे हिंदी सिनेसृष्टीतील प्रमुख स्थान आहे, त्यामुळेच याला ‘बॉलिवूड’ असे म्हणतात.

  • 18/21

    पाकिस्तानमधील लाहौर हे त्या ठिकाणच्या सिनेमाची राजधानी मानली जाते. त्यामुळे पाकिस्तानच्या सिनेसृष्टीला ‘लॉलीवूड’ असे म्हणतात. या ठिकाणी पंजाबी आणि उर्दू भाषेत चित्रपटांची निर्मिती केली जाते.

  • 19/21

    ‘कॉलिवूड’ हे नाव तामिळ चित्रपटसृष्टीसाठी वापरले जाते.

  • ‘सँडलवूड’ हे नाव कन्नड सिनेसृष्टीसाठी वापरण्यात येते.
  • 20/21

    तर तेलगू सिनेसृष्टीसाठी ‘टॉलिवूड’ हे नाव वापरले जाते.

TOPICS
बॉलिवूडBollywoodमनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment Newsमराठी बातम्याMarathi News

Web Title: Know the reason behind using word wood in major film industries like hollywood bollywood tollywood nrp

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.