• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • नरेंद्र मोदी
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. international emmy awards 2021 nawazuddin siddiqui from watchman to a chemist shares his journey nrp

‘वॉचमन’ ते ‘केमिस्ट’; नवाजुद्दीन सिद्दीकीचा थक्क करणारा प्रवास

बॉलिवूडमध्ये आपलं नाव कमवण्यासाठी त्याला मोठा संघर्ष करावा लागला होता.

Updated: November 23, 2021 21:58 IST
Follow Us
  • कोणत्याही क्षेत्रात मोलाचे स्थान मिळवण्यासाठी भरपूर मेहनत आणि परिश्रम करणं आवश्यक असते. प्रचंड मेहनतीच्या जोरावर सिनेसृष्टीत स्वत:ची एक वेगळी ओळख निर्माण करणारा अभिनेता म्हणून नवाजुद्दीन सिद्दीकीला ओळखले जाते.
    1/18

    कोणत्याही क्षेत्रात मोलाचे स्थान मिळवण्यासाठी भरपूर मेहनत आणि परिश्रम करणं आवश्यक असते. प्रचंड मेहनतीच्या जोरावर सिनेसृष्टीत स्वत:ची एक वेगळी ओळख निर्माण करणारा अभिनेता म्हणून नवाजुद्दीन सिद्दीकीला ओळखले जाते.

  • 2/18

    अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी याचे नाव मोठ्या सन्मानाने घेतलं जातं. त्याने आपल्या करिअरमध्ये आपल्या दमदार भूमिका साकारून चाहत्यांच्या मनात एक वेगळी जागा निर्माण केली आहे.

  • करोना आणि लॉकडाऊन काळात नवाजुद्दीनचे अनेक चित्रपट आणि मालिका OTT प्लॅटफॉर्म नेटफ्लिक्सवर रिलीज झाले आहेत. नवाजुद्दीनचा ऑक्टोबर २०२० मध्ये प्रदर्शित झालेला ‘सिरीयस मॅन’ हा चित्रपट प्रचंड गाजला.
  • 3/18

    या चित्रपटासाठी त्याला ४९ व्या आंतरराष्ट्रीय एमी पुरस्कार २०२१ मधील सर्वोत्कृष्ट अभिनेता हे नामांकन मिळाले आहे. त्यामुळे तो चर्चेत आला आहे. यानिमित्ताने नवाजुद्दीने त्याच्या बॉलिवूडमधील प्रवासाबद्दल सांगितले आहे

  • 4/18

    बॉलिवूडमध्ये आपलं नाव कमवण्यासाठी त्याला मोठा संघर्ष करावा लागला होता.

  • 5/18

    दमदार अभिनय आणि टॅलेंट असूनही केवळ त्याच्या लूकमुळे सुरुवातीला त्याला हवं तस यश मिळत नव्हतं.

  • 6/18

    उत्तर प्रदेशातील एका छोट्याशा गावात नवाजुद्दीनचा जन्म झाला. नवाज लहान असताना त्याच्या घरी टीव्ही देखील नव्हता. मात्र त्याला टीव्हीचे प्रचंड वेड असल्याने तो सर्व सोडून दुसऱ्यांच्या घरी जाऊन टीव्ही बघायचा. त्यावेळीच त्याने अभिनेता बनण्याचे स्वप्न उराशी बाळगले होते.

  • 7/18

    नवाजने १९९६ मध्ये दिल्लीतील नॅशनल स्कूल ऑफ ड्रामामधून अभिनयाचे शिक्षण घेतले. त्यानंतर पुढे नशीब आजमावण्यासाठी तो मुंबईला गेला.

  • 8/18

    नवाजने फार मेहनत करुन अॅक्टिंग स्कूलमध्ये प्रवेश घेतला होता, पण त्याच्याकडे राहायला घर नव्हते. त्यामुळे त्याला सुरक्षारक्षकाची नोकरी करावी लागली.

  • नवाजला ही नोकरी मिळाली, पण शारीरिकदृष्ट्या तो खूपच कमजोर होता. त्यामुळे तो अनेकदा ड्युटी करत असताना बसायचा. हे मालकाला समजल्यानंतर त्याने त्याला नोकरीवरुन काढून टाकले.
  • 9/18

    त्याशिवाय गुजरातमध्ये असताना बडोदा शहरात त्याने केमिस्ट म्हणूनही काम केले. अनेकदा नवाजला दोन वेळेचे अन्नही मिळत नव्हते

  • 10/18

    दिल्लीमध्ये जेव्हा मी थिएटर करत होतो तेव्हा पैशांच्या समस्येमुळे मी फार विचित्र नोकऱ्या केल्या आहेत, असे नवाजुद्दीने यावेळी सांगितले.

  • 11/18

    नवाजुद्दीने सिद्दीकी हा सिनेसृष्टीच्या पदार्पणाच्या काळात कोणतीही भूमिका करायला तयार असायचा.

  • 12/18

    त्यामुळे सुरुवातीला त्याला वेटर, चोर यासारख्या छोट्या भूमिका साकारताना लाज वाटली नाही. नवाजुद्दीने आतापर्यंत ‘शूल’, ‘मुन्नाभाई एमबीबीएस’ आणि ‘सरफरोश’ यासारख्या चित्रपटांमध्ये ही लहान भूमिका साकारल्या होत्या.

  • 13/18

    नवाजुद्दीन सिद्दीकीला अनुराग कश्यपच्या ‘ब्लॅक फ्रायडे’ या चित्रपटात काम करण्याची संधी मिळाली. त्यानंतर त्याने मागे वळून पाहिले नाही.

  • 14/18

    त्याने ‘फिराक’, ‘न्यूयॉर्क’ आणि ‘देव डी’ सारख्या चित्रपटात काम केले. सुजॉय घोषच्या ‘कहानी’ या चित्रपटातील त्याच्या भूमिकेचे प्रचंड कौतुक झाले.

  • 15/18

    तर ‘गँग्स ऑफ वासेपूर’ या चित्रपटामुळे तो प्रसिद्धीझोतात आला.

  • 16/18

    ‘बंदूकबाज’मधील बाबू मोशायची भूमिका असो किंवा सेक्रेड गेम्समधील गणेश गायतोंडे ही भूमिका प्रचंड गाजली.

TOPICS
बॉलिवूडBollywoodमनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment Newsमराठी बातम्याMarathi News

Web Title: International emmy awards 2021 nawazuddin siddiqui from watchman to a chemist shares his journey nrp

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.