• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • पाऊस
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. these actresses are living a life of luxury after getting divorced know the list nrp

रश्मी देसाई ते मलायका अरोरा; घटस्फोटानंतर ऐशोआरामात जगतात ‘या’ अभिनेत्री

बॉलिवूडमध्ये लग्न आणि घटस्फोट ही एक फार सर्वसामान्य बाब समजली जाते.

Updated: November 29, 2021 10:40 IST
Follow Us
  • बॉलिवूडमध्ये लग्न आणि घटस्फोट ही एक फार सर्वसामान्य बाब समजली जाते. बॉलिवूडमधील अनेक स्टार्स असे आहेत जे त्यांच्या आवडत्या व्यक्तीसोबत लग्न करतात. मात्र त्यानंतर खटके उडायला लागल्यानंतर घटस्फोटही घेतात.
    1/10

    बॉलिवूडमध्ये लग्न आणि घटस्फोट ही एक फार सर्वसामान्य बाब समजली जाते. बॉलिवूडमधील अनेक स्टार्स असे आहेत जे त्यांच्या आवडत्या व्यक्तीसोबत लग्न करतात. मात्र त्यानंतर खटके उडायला लागल्यानंतर घटस्फोटही घेतात.

  • 2/10

    आज आम्ही तुम्हाला अशा बॉलिवूड अभिनेत्रींविषयी सांगणार आहोत, ज्या आपल्या पतीपासून घटस्फोट घेतल्यानंतरही ऐशोआरामातील जीवन जगत आहेत.

  • 3/10

    जेनिफर विंगेटने ९ एप्रिल २०१२ रोजी टीव्ही अभिनेता करण सिंग ग्रोव्हरशी लग्न केले. मात्र लग्नाच्या २ वर्षानंतर म्हणजेच २०१४ मध्ये दोघांचा घटस्फोट झाला. त्यानंतर जेनिफरने ही खूप आनंदी जीवन जगत आहे. ती तिच्या आयुष्यात फार खूश असल्याचे अनेकदा पाहायला मिळते.

  • 4/10

    कल्की कोचलिनने बॉलिवूड दिग्दर्शक अनुराग कश्यपशी लग्न केले होते. मात्र त्यांचे हे नातेही फार काळ टिकले नाही. लग्नानंतर काही वर्षांनी दोघांनी घटस्फोट घेतला. कल्कीने काही महिन्यांपूर्वी एका मुलाला जन्म दिला आहे.

  • 5/10

    अभिनेत्री करिश्मा कपूर आणि संजय कपूर यांच्यात २०१४ मध्ये भांडणाला सुरूवात झाली. संजय कपूरचं वागणं यामागील कारण असल्याचं बोललं जातं. २०१६ मध्ये अखेर दोघेही विभक्त झाले. लग्नानंतर करिश्मा ही फार ऐशोआरामात जीवन जगत आहे.

  • 6/10

    महिमा चौधरीने बॉबी मुखर्जीसोबत लग्न केले होते. मात्र २०१३ मध्ये ते दोघे वेगळे झाले. घटस्फोटानंतर महिमा आज तिचे जीवन आनंदात जगताना दिसत आहे.

  • 7/10

    अरबाज आणि मलायकांनी लग्नाच्या १८ वर्षानंतर विभक्त होण्याचा निर्णय घेतला. बांद्राच्या कोर्टात त्यांचा घटस्फोट झाला. अर्जन कपूरसोबत मलायकाची वाढलेली जवळीक या घटस्फोटाचं कारण असल्याचं बोललं जातेय.

  • 8/10

    घटस्फोटानंतर अरबाज खान इटालियन मॉडेल जॉर्जिया एंड्रियानीला डेट करत आहे. मात्र सध्या मलायका ही तिच्या आयुष्यात फार खूश असल्याचे दिसून येत आहे.

  • 9/10

    मनिषा कोईराला हिने नेपाळमध्ये राहणाऱ्या सम्राट दहलसोबत लग्न केले होते. मात्र २०१२ मध्ये ते दोघेही एकमेकांपासून वेगळे झाले. त्यांच्या घटस्फोटाचे कारण अद्याप समोर आलेले नाही. मात्र घटस्फोटानंतर मनिषा फार सुखी आयुष्य जगताना दिसत आहे.

  • 10/10

    रश्मी देसाई आणि नंदिश संधू यांनी काही वर्षांपूर्वी विवाहबंधनात अडकण्याचा निर्णय घेतला. एकमेकांसोबत काम करताना त्यांच्यातील जवळीक वाढली होती. मात्र लग्नानंतर काही दिवसांनी ते दोघे वेगळे झाले. पतीपासून घटस्फोट घेतल्यानंतर रश्मीच्या आयुष्यात अनेक समस्या आल्या. मात्र आज ती फार सुखी आणि आनंदी जीवन जगत आहे.

TOPICS
बॉलिवूडBollywoodमनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment Newsमराठी बातम्याMarathi News

Web Title: These actresses are living a life of luxury after getting divorced know the list nrp

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.