-
मराठी सिनेसृष्टीतील एक गोड चेहरा म्हणजे अभिनेत्री रितीका श्रोत्री.
-
या चेहऱ्यानं एंट्रीलाच प्रेक्षकांवर मोहिनी घालत आपल्या अनोख्या अभिनयशैलीचा जलवा दाखवला.
-
रितीकानं ‘टकाटक’ सिनेमात एक गावरान व्यक्तिरेखा साकारली होती.
-
रितीकाचा ‘डार्लिंग’ हा मराठी चित्रपट १० डिसेंबरला प्रदर्शित झाला.
-
समीर आशा पाटील यांनी ‘डार्लिंग’चं दिग्दर्शन केलं आहे.
-
समीर पाटील यांनी आजवर नेहमीच प्रवाहापेक्षा वेगळे विषय हाताळत मराठीच्या कक्षा रुंदावणाऱ्या चित्रपटांचं आपल्या अनोख्या शैलीत दिग्दर्शन केलं आहे.
-
या चित्रपट रितिका श्रोत्री ही मुख्य भूमिका साकारत आहे. तर महाराष्ट्राचा लाडका अभिनेता अशी ओळख असलेला प्रथमेश परब नायक म्हणून लाभला आहे.
-
यापूर्वी रितिका आणि प्रथमेशने ‘टकाटक’ या चित्रपटात एकत्र स्क्रीन शेअर केली होती.
-
‘लागीरं झालं जी’ आणि ‘कारभारी लयभारी’ फेम निखिल चव्हाणचीही या चित्रपटात महत्त्वाची भूमिका आहे.
-
या सिनेमात प्रथमेश-रितिका-निखिल यांच्या जोडीला मंगेश कदम, आनंद इंगळे आदी कलाकारांच्या प्रमुख भूमिका आहेत.
-
या चित्रपटाला प्रेक्षकांचा प्रचंड प्रतिसाद मिळत आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : रितीका श्रोत्री / इन्स्टाग्राम)
Photos: बबली ‘डार्लिंग’चा बोल्ड अंदाज
Web Title: Darling marathi movie babli fame actress ritika shrotri bold photos sdn