• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • पाऊस
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. shah rukh khan becomes a bollywood king khan because of one condition nrp

दिग्दर्शकाची ‘ती’ एक अट आणि शाहरुख खान बनला बॉलिवूडचा ‘किंग खान’

शाहरुखच्या या यशात दिग्दर्शक लेख टंडन यांचा मोलाचा वाटा आहे.

Updated: December 15, 2021 17:21 IST
Follow Us
  • ‘किंग खान’, ‘बाजीगर’, ‘किंग ऑफ रोमॅन्स’ अशा विविध नावाने बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानला ओळखले जाते.
    1/17

    ‘किंग खान’, ‘बाजीगर’, ‘किंग ऑफ रोमॅन्स’ अशा विविध नावाने बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानला ओळखले जाते.

  • 2/17

    भारतासह परदेशातही शाहरुखचा तुफान चाहतावर्ग आहे. पण बॉलिवूडचा सुपरस्टार होण्यासाठी त्याला प्रचंड मेहनत करावी लागली होती. शाहरुखने त्याच्या करिअरची सुरुवात टीव्ही शो ‘फौजी’मधून केली हे सर्वांना माहिती आहे.

  • 3/17

    अभिनयाशी दूरदूरपर्यंत संबंध नसलेल्या शाहरुखचा किंग खानपर्यंतचा प्रवास फार कठीण होता.

  • 4/17

    पण सिनेसृष्टीतील एका दिग्गज दिग्दर्शकाने त्याच्यासमोर ठेवलेली अट त्याच्या करिअरसाठी टर्निंग पाईंट ठरली.

  • 5/17

    शाहरुखच्या या यशात दिग्दर्शक लेख टंडन यांचा मोलाचा वाटा आहे. कारण त्यांनीच त्याला पहिल्यांदा ब्रेक दिला होता.

  • 6/17

    ८०-९० च्या दशकात शाहरुख हा त्याच्या सिनेसृष्टीतील करिअरसाठी प्रचंड संघर्ष करत होता. त्यावेळी शाहरुख स्टाईल म्हणून डोक्यावर लांब केस ठेवायचा.

  • 7/17

    त्यावेळी लेख टंडन दिल्लीत एका टेलिव्हिजन मालिकेचे शूटिंग करत होते.

  • 8/17

    त्यावेळी एकदा लांब केस असलेला एक मुलगा त्यांच्या सेटवर कोणाला तरी सोडण्यासाठी आल्याचे त्यांनी पाहिले. हा मुलगा दुसरा तिसरा कोणी नसून शाहरुखच होता.

  • 9/17

    यावेळी लेख टंडन यांनी शाहरुखला पाहिले आणि त्याला थांबवून त्याची विचारपूस केली.

  • 10/17

    या दरम्यान लेख यांनी शाहरुखला विचारले, ‘तू माझ्यासोबत काम करशील का? पण त्यासाठी तुला माझी एक अट मान्य करावी लागेल.’

  • 11/17

    यावेळी शाहरुखने होकारार्थी मान डोलावली आणि अट काय असे विचारले. त्यावेळी लेख म्हणाले की, ‘तुला तुझे केस कापावे लागतील.’

  • 12/17

    त्यावेळी शाहरुखला त्याचे केस प्रचंड आवडत होते. पण सिनेसृष्टीत येण्यासाठी त्याने ते कापण्याचे ठरवले.

  • 13/17

    ‘पण जर मी केस कापून आलो आणि मला काम करण्याची संधी मिळालीच नाही तर?’ असा प्रश्न शाहरुखने लेख टंडन यांना विचारला

  • 14/17

    यावर ते हसत म्हणाले, ‘तू केस कापून तर ये. तुला नक्कीच काम मिळेल.’

  • 15/17

    यानंतर शाहरुख थोडेसे केस कापून आला. पण तेव्हा लेख त्याला म्हणाले, ‘एवढेसे केस कापून काहीही होणार नाही. तुला अजून केस कापावे लागतील.’

  • 16/17

    यानंतर शाहरुखने पुन्हा जाऊन त्याचा हेअरकट केला होता. यानंतर त्याला ‘दिल दरिया’ या मालिकेत काम करण्याची संधी मिळाली.

  • 17/17

    ‘दिल दरिया’ या मालिकेतील त्याची भूमिका प्रचंड गाजली. त्यामुळेच पुढे त्याला ‘फौजी’ या मालिकेत काम करण्याची संधी मिळाली.

TOPICS
बॉलिवूडBollywoodमनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment Newsमराठी बातम्याMarathi News

Web Title: Shah rukh khan becomes a bollywood king khan because of one condition nrp

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.