• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • वाचक सर्वेक्षण
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • माणिकराव कोकाटे
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. star pravah dhum dhadaka 2022 special dance performance new year celebration photos sdn

स्टार प्रवाह धुमधडाका २०२२ : कलाकारांच्या जोशपूर्ण परफॉर्मन्सने रंगणार नवीन वर्षाची पार्टी

December 26, 2021 13:38 IST
Follow Us
  • Star Pravah Dhum Dhadaka 2022 Photos
    1/12

    इथे तारे आहेत इथे सारे आहेत, इथे दोस्ती आहे इथे मस्ती आहे, इथे धमाल आहे आणि इथेच धुमधडाका आहे.

  • 2/12

    धमाल गाणी, हटके परफॉर्मन्स, जोशभरा माहोल आणि विनोदाचा खमंग तडका जर तुम्हाला तुमच्या लाडक्या कलाकारांसोबत अनुभवता आला तर? सेलिब्रेशनची रंगत द्विगुणीत होणार हे वेगळं सांगायला नको.

  • 3/12

    ‘स्टार प्रवाह धुमधडाका २०२२’ या नववर्ष विशेष कार्यक्रमातून प्रेक्षकांना मनोरंजनाची धमाल मेजवानी अनुभवायला मिळणार आहे.

  • 4/12

    सरत्या वर्षाला हसरा निरोप देत नवीन वर्षाचं स्वागत करण्यासाठी स्टार प्रवाहचे कलाकार सज्ज आहेत.

  • 5/12

    तुमच्या लाडक्या कलाकारांचा आजवर कधीही न पाहिलेला अंदाज या कार्यक्रमाच्या निमित्ताने घरबसल्या सहकुटुंब अनुभवता येईल.

  • 6/12

    स्टार प्रवाहच्या कलाकारांसोबतच श्रुती मराठे, मृण्मयी देशपांडे, संस्कृती बालगुडे, मानसी नाईक यांच्या दिलखेचक अदाही या कार्यक्रमातून पाहायला मिळतील.

  • 7/12

    आनंद शिंदेंची गाणी ऐकली की पाय आपसुकच थिरकायला लागतात.

  • 8/12

    स्टार प्रवाह धुमधडाका २०२२ हा कार्यक्रमही याला अपवाद ठरला नाही. आनंद शिंदेंच्या गाण्यावर स्टार प्रवाहचा संपूर्ण परिवार मनसोक्त नाचला.

  • 9/12

    अवधूत गुप्ते आणि आदर्श शिंदे यांच्या अफलातून जुगलबंदीने कार्यक्रमाला चार चांद लागले.

  • 10/12

    खास बात म्हणजे ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ मालिकेतील गौरी आणि सुप्रसिद्ध अभिनेत्री ऊर्मिला कोठारे हीने पहिल्यांदाच एकत्र स्टेज शेअर करत एक अनोखा नृत्याविष्कार सादर केला.

  • 11/12

    हटके परफॉर्मन्ससोबतच सिद्धार्थ जाधव आणि सिद्धार्थ चांदेकर दोघांच्या खुमासदार सुत्रसंचलनाने या कार्यक्रमात वेगळीच रंगत आणली.

  • 12/12

    तेव्हा पाहायला विसरु नका ‘स्टार प्रवाह धुमधडाका २०२२’ रविवार २ जानेवारीला सायंकाळी ७ वाजता.

TOPICS
मनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment NewsमराठीMarathiमराठी बातम्याMarathi News

Web Title: Star pravah dhum dhadaka 2022 special dance performance new year celebration photos sdn

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.