• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • वाचक सर्वेक्षण
  • आजचा जोक
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • देवेंद्र फडणवीस
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. indian idol 12 second runner up sayli kamble opened up about her boyfriend dhawal and love life nrp

‘इंडियन आयडॉल’ मधील मराठी स्पर्धकाने केले ‘लव्ह लाईफ’बद्दल खुलासे, म्हणाली, “त्याचे कुटुंब मला…”

इंडियन आयडॉल कार्यक्रमातील स्पर्धक हे नेहमीच काही ना काही कारणामुळे चर्चेत असतात.

December 26, 2021 19:01 IST
Follow Us
  • इंडियन आयडॉल कार्यक्रमातील स्पर्धक हे नेहमीच काही ना काही कारणामुळे चर्चेत असतात. इंडियन आयडॉल १२ ची दुसरी विजेती आणि मराठमोळ्या सायली कांबळेचा नुकताच साखरपुडा पार पडला. सायलीने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन साखरपुड्याचे अनेक फोटो पोस्ट केले आहेत.
    1/10

    इंडियन आयडॉल कार्यक्रमातील स्पर्धक हे नेहमीच काही ना काही कारणामुळे चर्चेत असतात. इंडियन आयडॉल १२ ची दुसरी विजेती आणि मराठमोळ्या सायली कांबळेचा नुकताच साखरपुडा पार पडला. सायलीने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन साखरपुड्याचे अनेक फोटो पोस्ट केले आहेत.

  • 2/10

    सायलीने तिचा बॉयफ्रेंड धवलसोबत साखरपुडा केला. या कार्यक्रमाचे अनेक फोटो धवलनेही शेअर केले आहेत. त्याला हटके कॅप्शनही दिले आहेत.

  • 3/10

    सायलीचा साखरपुडा थाटामाटात पार पडल्यानंतर नुकतंच तिच्या लव्ह लाईफबद्दल अनेक खुलासे केले आहेत. त्यासोबत तिने तिच्या लग्नाची तारीखही जाहीर केली आहे.

  • 4/10

    ‘टाईम्स ऑफ इंडिया’ला दिलेल्या मुलाखतीदरम्यान ती म्हणाली, “आम्ही दोघं एकमेकांना गेल्या तीन वर्षांपासून ओळखतो. तो माझा एक चांगला मित्र होता. ज्याने मला काही महिन्यांपूर्वी लग्नासाठी प्रपोज केले आणि मी हो म्हणाली.”

  • 5/10

    “धवलने नेहमीच मला माझ्या कम्पर्ट झोनमधून बाहेर पडण्यासाठी आणि ध्येय साध्य करण्यासाठी प्रेरणा दिली आहे,” असेही तिने सांगितले.

  • 6/10

    यापुढे सायली म्हणाली, “मला आयुष्यात जे काही मिळाले त्यात मी समाधान मानणारी व्यक्ती आहे. मी फार मोठी स्वप्ने पाहत नाही. पण धवलनेच मला मोठी स्वप्ने पाहण्याची प्रेरणा दिली.”

  • 7/10

    “आता मी माझ्या करिअरमध्ये चांगली कामगिरी करत आहे. तेव्हाही त्याने मला मोठे विचार करण्याचा सल्ला दिला,” असेही तिने सांगितले

  • 8/10

    “त्याचे कुटुंब मला आणि माझ्या प्रोफेशनला खूप पाठिंबा देतात. मी स्वतःला भाग्यवान समजते की मी त्याच्या कुटुंबाचा एक भाग आहे,” असेही सायली म्हणाली.

  • 9/10

    यानंतर सायलीला लग्नाच्या तारखेबद्दल विचारले असता ती म्हणाली की, मे २०२२ पूर्वी आम्ही लग्न करणार नाही. कारण एका संगीत टूरसाठी मी परदेशात जाणार आहे.

  • दरम्यान सायलीने सप्टेंबर २०२१ दरम्यान इन्स्टाग्रामवर धवलसोबत फोटो शेअर केला होता. यावेळी तिने ‘चलो जी आज साफ-साफ कहती हूं, इतनी सी बात है, मुझे तुमसे प्यार है।’ असे कॅप्शन दिले होते.
TOPICS
बॉलिवूडBollywoodमनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment Newsमराठी बातम्याMarathi News

Web Title: Indian idol 12 second runner up sayli kamble opened up about her boyfriend dhawal and love life nrp

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.