Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • मनोज जरांगे पाटील
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. know about bigg boss marathi season 3 winner vishal nikam struggle gym trainer career inspirational story tv serial movies photos sdn

जिम ट्रेनर ते ‘बिग बॉस मराठी ३’चा विजेता; जाणून घ्या, विशाल निकमबद्दल…

December 27, 2021 10:05 IST
Follow Us
  • Bigg Boss Marathi 3 Winner Vishal Nikam Information
    1/24

    १०० दिवस, १७ सदस्य आणि एक ट्रॉफी! बिग बॉस मराठीच्या घरामध्ये आलेला प्रत्येक सदस्य जिंकण्याचे ध्येय घेऊन घरात आला.

  • 2/24

    कार्यक्रमाच्या तिसर्‍या पर्वाला देखिल संपूर्ण महाराष्ट्राने भरभरून प्रेम दिले.

  • 3/24

    प्रत्येक सदस्याने प्रेक्षकांची मने जिंकायला पहिल्या भागापासून सुरुवात केली.

  • 4/24

    प्रत्येक घरात, देशाच्या कानाकोपरामध्ये फक्त ‘बिग बॉस’ मराठीची चर्चा रंगत गेली. मग ती टास्कविषयी असो, घरात होणार्‍या राड्यांविषयी असो वा सदस्यांच्या दिवसागणिक बदलणार्‍या नात्यांविषयीची असो.

  • 5/24

    ‘बिग बॉस’ मराठीच्या तिसर्‍या पर्वाचा महाअंतिम सोहळा नुकताच मुंबई येथे पार पाडला.

  • 6/24

    आणि शेवटी तो क्षण आला ज्याची वाट संपूर्ण महाराष्ट्र पहात होता, महाराष्ट्राला ‘बिग बॉस’ मराठीच्या तिसर्‍या पर्वाचा विजेता मिळाला.

  • 7/24

    विशाल निकम ठरला ‘बिग बॉस’ मराठीच्या तिसर्‍या पर्वाचा विजेता तर जय दुधाणेने पटकावले दुसरे स्थान.

  • 8/24

    विशाल निकमला २० लाख इतकी धनराशी मिळाली आणि ट्रॉफी.

  • 9/24

    खेळाडूवृत्ती, टास्क जिंकण्याची त्याची जिद्द, घरातील वावर, स्पष्टवक्तेपणा यामुळे तो नेहेमीच चर्चेत राहिला.

  • 10/24

    सध्या सोशल मीडियावर विशालवर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

  • 11/24

    स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘साता जल्माच्या गाठी’ या मालिकेतून विशालने छोट्या पडद्यावर पदार्पण केले.

  • 12/24

    विशालचा अभिनयाचा प्रवास मात्र वाटतो तितका सोपा नाही.

  • 13/24

    मुळचा सांगलीकर असणाऱ्या विशालला लहानपणापासूनच अभिनयाचं वेड होतं.

  • 14/24

    वडील शेतकरी, घरात कुणीही अभिनय क्षेत्रात नाही. अश्या परिस्थितीतही विशालने आपला हट्ट सोडला नाही.

  • 15/24

    मास्टर इन फिजिक्सची पदवी आणि सोबतीला अभिनयाचे धडे घेत असताना त्याने स्वप्नांचा पाठलाग करत मुंबई गाठली.

  • 16/24

    अभिनय क्षेत्रात पाऊल कसं टाकावं याची माहिती मिळवण्यासाठी त्याने मुंबईतल्या एका जिममध्ये पर्सनल ट्रेनर म्हणून कामाला सुरुवात केली.

  • 17/24

    ‘दख्खनचा राजा ज्योतिबा’ या मालिकेतून विशाल प्रसिद्धीझोतात आला.

  • 18/24

    विशालने ‘मिथुन’ आणि ‘धुमस’ या चित्रपटांत भूमिका साकारल्या आहेत.

  • 19/24

    अभिनय क्षेत्रात यायचं तर फिटनेसशिवाय पर्याय नाही याची त्याला जाणीव होती आणि आहे. त्यामुळेच तर शूटिंगच्या वेळा सांभाळत तो फिटनेसवरही तितकीच मेहनत घेतो.

  • 20/24

    अभिनयासोबतच डान्स, मार्शल आर्ट्स आणि तलवार बाजीचंही विशालने प्रशिक्षण घेतलं आहे.

  • 21/24

    क्रिकेटमध्येही विशाल पारंगत आहे.

  • 22/24

    विशालच्या जिद्दीची ही कहाणी तमाम तरुणाईसाठी नक्कीच प्रेरणादायी आहे.

  • 23/24

    सिनेमातल्या एखाद्या गोष्टीप्रमाणेच विशालची कहाणी आहे.

  • 24/24

    (सर्व फोटो सौजन्य : विशाल निकम / इन्स्टाग्राम)

TOPICS
मनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment NewsमराठीMarathiमराठी बातम्याMarathi News

Web Title: Know about bigg boss marathi season 3 winner vishal nikam struggle gym trainer career inspirational story tv serial movies photos sdn

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.