-
अभिनेता विशाल निकम ‘बिग बॉस’ मराठीच्या तिसऱ्या पर्वाचा विजेता ठरला.
-
‘बिग बॉस’चा विजेता ठरल्यानंतर विशालच्या नावाचा ट्रेंडही सोशल मीडियावरही पाहायला मिळाला.
-
सांगलीतील गरीब कुटुंबातून आलेल्या विशालने आपल्या नम्र स्वभावाने सर्वांचंच मन जिंकलं.
-
विशालच्या खेळाप्रतीच्या चिकाटीचे सर्वांनीच कौतुक केलंय.
-
विशालने ‘बिग बॉस’मधील हा विजय पंढरपूरच्या विठ्ठलाच्या चरणी समर्पित केला आहे.
-
३० डिसेंबरला विशालने पंढरपूरच्या विठ्ठलाचे दर्शन घेतले.
-
यावेळी ‘बिग बॉस’मधील स्पर्धक किर्तनकार शिवलीला पाटीलसुद्धा उपस्थित होती.
-
“बिग बॉसच्या घरामध्ये मी बोललो होतो, पहिलं जर कोणाला भेटीन तर शिवलीला ह्यांना आणि आज आमची भेट झाली ती सुद्धा मार्गशीर्ष महिन्यात… माऊलींच्या पंढरपुरात! ही भेट माऊलींनीच घडवून आणली असावी!” असं विशाल म्हणाला.
-
विशाल मंदिरातून बाहेर आल्यानंतर त्याच्या चाहत्यांनी त्याच्याभोवती गर्दी केल्याचं पाहायला मिळालं.
Photos : ‘बिग बॉस मराठी ३’ विजेता विशाल निकम विठुमाऊलीच्या दर्शनाला
Web Title: Bigg boss marathi season 3 winner vishal nikam visited pandharpur vitthal rukmini mandir maharashtra photos sdn