• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • वाचक सर्वेक्षण
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • पावसाळी अधिवेशन
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. pushpa allu arjun beard style and action story scsg

Photos: दाढीवरुन हात फिरवण्याची ‘पुष्पा’ची रावडी Action कशी सुचली?; अल्लू अर्जून खुलासा करताना म्हणाला, “एकदा…”

सध्या पुष्पा चित्रपटामधील अल्लू अर्जुनच्या या स्टाइलची सोशल नेटवर्किंगवर फारच चर्चा असल्याचं दिसून येतंय.

January 17, 2022 17:34 IST
Follow Us
    • pushpa allu arjun beard style and action story
      दाक्षिणात्य सुपरस्टार अल्लू अर्जुनचा ‘पुष्पा द राइज’ हा चित्रपट प्रदर्शित झाल्यापासून चर्चेत आहे.
    • 1/24

      या चित्रपटात अल्लू अर्जुनसोबत अभिनेत्री रश्मिका मंदाना मुख्य भूमिकेत आहे.

    • 2/24

      या चित्रपटाला प्रेक्षकांचा तुफान प्रतिसाद मिळत आहे.

    • 3/24

      या चित्रपटाने कमाईच्या बाबतील अनेक रेकॉर्ड केले आहेत.

    • 4/24

      हिंदी पट्ट्यामध्येही अल्लू अर्जुनच्या या चित्रपटामध्ये अनपेक्षितपणे चांगली कमाई केलीय.

    • 5/24

      नुकताच हा चित्रपट अ‍ॅमेझॉन प्राइमवर हिंदीमध्ये प्रदर्शित झालाय.

    • 6/24

      आधी चार दाक्षिणात्य भाषांमध्ये ओटीटीवर आल्यानंतर संक्रांतीच्या मुहूर्तावर या चित्रपाटची हिंदी अवृत्ती ओटीटीवर प्रदर्शित करण्यात आली.

    • 7/24

      हिंदी डबिंगमध्ये मराठमोळा अभिनेता श्रेयस तळपदेने अल्लू अर्जुनला म्हणजेच पुष्पाला आवाज दिलाय.

    • 8/24

      हिंदी व्हर्जन ओटीटीवर आल्यापासून देशभरातील चाहते अल्लू अर्जुनचं कौतुक करताना थकत नसल्याचं चित्र दिसतंय.

    • 9/24

      या चित्रपटामधील पुष्पाच्या भूमिकेत अल्लू अर्जुनने केलेल्या काही खास अ‍ॅक्शन चांगल्याच चर्चेत आहेत.

    • 10/24

      अगदी तोंडामध्ये बीडी पकडण्याच्या पुष्पाच्या शैलीवरही चहाते फिदा झालेत.

    • 11/24

      अल्लू अर्जूनने साकारलेल्या पुष्पाच्या प्रेमात पडलेल्या चाहत्यांमध्ये काही चाहत्यांचाही समावेश असून क्रिकेटपटू रविंद्र जडेजा त्यापैकीच एक आहे.

    • 12/24

      जडेजाने तोंडात बीडी पकडण्याची पुष्पाची नक्कल करत एक फोटोही आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर केलाय.

    • 13/24

      बीडी पकडण्याच्या शैलीबरोबरच या चित्रपटामध्ये अल्लू अर्जुनने केलेली प्रत्येक छोटी मोठी गोष्ट सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरतेय.

    • 14/24

      त्यामध्ये अगदी श्रीवल्ली गाण्यामधील पाय घसरत चालण्याची स्टेप असो किंवा मग दाढीखालून हात फिरवण्याची अ‍ॅक्शन असतो, अल्लू अर्जुन चाहत्यांमध्ये कितीय लोकप्रिय हेच पुन्हा या चित्रपटाच्या निमित्ताने दिसून येत आहे.

    • 15/24

      एका चंदन तस्कराची भूमिका साकारणाऱ्या अल्लू अर्जुनने गेेटअपवर बरीच मेहनत घेतलीय.

    • 16/24

      मोठी दाढी, एक खांदा वाकून चालणं, लुंगी असा सारा दाक्षिणात्य पेहराव आणि एकंदरितच भूमिकेसाठी आवश्यक असणारी शैली अल्लू अर्जुनने अगदी मस्त कॅरी केलीय.

    • 17/24

      याच चित्रपटामधील दाढी खालून हात फिरवत आपण झुकणार नाही असं पुष्पा त्याच्या विरोधकांना सांगताने काही सिन्स आहेत. हे सीन आणि ही स्टाइल तरुणाईला फारच पसंत आलीय.

    • 18/24

      अगदी गाण्यापासून ते चित्रपटाच्या इंटरव्हललाही पुष्पाची हीच खास शैली दिग्दर्शकांनी अनेक ठिकाणी वापरलीय.

    • 19/24

      पण ही स्टाइल कुठून आणि कशी गवसली याचा मजेदार किस्सा अल्लू अर्जुनने दैनिक भास्करला दिलेल्या एका विशेष मुलाखतीमध्ये सांगितला.

    • 20/24

      या चित्रपटामध्ये मारहाण आणि रक्तपात मोठ्या प्रमाणात दाखवण्यात आलाय. अशाच एका सीनच्या चित्रिकरणादरम्यान अल्लू अर्जुनने सीन संपताना दाढीवरुन हात फिरवला होता.

    • 21/24

      अल्लू अर्जुनने केलेली ही अ‍ॅक्शन सेटवर असणाऱ्या दिग्दर्शकांनी पाहिली आणि त्यांना ही पसंत पडली. “एकदा शुटींगदरम्यान मी त्या स्टाइलने माझ्या दाढी खालून हात फिरवला आणि तो दिग्दर्शकाने पाहिला,” असं अल्लू अर्जुन सांगतो.

    • 22/24

      दिग्दर्शक सुकुमार यांनी अल्लू अर्जूनला याबद्दल सांगितलं. “ही जी अ‍ॅक्शन केलीय ना, ती फार छान आहे. आपण घेऊयात ही चित्रपटामध्ये असं दिग्दर्शक मला म्हणाले,” असं अर्जुन मुलाखतीमध्ये म्हणालाय.

    • 23/24

      त्यानंतर या दमदार अ‍ॅक्शनला एक दमदार संवाद देण्यासाठी झुकेगा नही असा संवाद चित्रपटात अनेक ठिकाणी वापरण्यात आला. (फोटो सौजन्य: सोशल मीडिया आणि युट्यूब टी सीरीजवरुन साभार)

TOPICS
मनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment NewsमराठीMarathiमराठी बातम्याMarathi News

Web Title: Pushpa allu arjun beard style and action story scsg

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.