-
करीना कपूर-शाहीद कपूरपासून सलमान खान-कॅटरीना कैफपर्यंत अनेक कलाकारांनी ब्रेकअपनंतरही सोबत काम केलं. इतकंच नाही, तर नात्यातील कडवटपणा स्क्रीनवर येऊ दिला नाही. त्यामुळेच व्यक्तिगत आयुष्यात कडवटपणा असूनही या कलाकारांच्या केमेस्ट्रीला दर्शकांनी भरभरून दाद दिली. चला तर जाणून घेऊयात अशा १२ कलाकारांविषयी.
-
एक काळ होता जेव्हा माधुरी दीक्षित आणि संजय दत्त यांच्या अफेअरची चर्चा व्हायची. मात्र, संजय दत्तचं नाव ताडा प्रकरणात आलं आणि माधुरी संजय दत्तपासून दूर झाली. त्यानंतर दोघांनी कधीही स्क्रिनवर सोबत काम केलं नाही. मात्र, २०१९ मध्ये २१ वर्षांनी ते पुन्हा कलंक या चित्रपटात दिसले.
-
कॅटरीना कैफ सलमान खानसोबतच्या नात्यात होती. मात्र, नंतर दोघे परस्पर संमतीने वेगळे झाले. यानंतरही कॅटरीनाने सलमानसोबत ‘टायगर जिंदा है’मध्ये काम केलं.
-
करीना कपूर आणि शाहीद कपूर देखील रिलेशनशिपमध्ये होते. मात्र, ‘जब वी मेट’ चित्रपटा दरम्यान दोघांमध्ये अंतर यायला लागलं. तेव्हा करीना आणि सैफ यांच्यातील मैत्री वाढली होती. असं असूनही करीना आणि शाहीद दोघांनी हा चित्रपट तर पूर्ण केलाच, सोबत उडता पंजाबमध्ये देखील ते सोबत दिसले. यातही त्यांची ऑनस्क्रीन केमेस्ट्री जबरदस्त दिसली.
-
रणबीर कपूर आणि दीपिका पादुकोणचं ब्रेकअप एकेकाळी खूप चर्चेचा विषय होता. असं असूनही दोघांनी ‘ये जवानी है दीवानी’ चित्रपटात सोबत काम केलं. आता दोघांमध्ये मैत्री देखील आहे.
-
दीपिकानंतर रणबीरचं नाव कॅटरीना कैफसोबतही जोडलं गेलं. मात्र, दोघांचं हे नातं लवकरच संपलं. ब्रेक अपनंतर कॅटरिना आणि रणबीरने जग्गा जासूस चित्रपटात सोबत काम केलं. (Photos: Social Media)
-
या यादीत शेवटचं नाव अमिताभ बच्च-रेखा यांचं आहे. दोघांनीही कधीच त्याचं नातं स्विकार केलं नाही. मात्र, दोघांच्या अफेअरविषयी जोरदार चर्चा होती. असं असताना अमिताभ बच्चन ‘सिलसिला’ चित्रपटात जया बच्चनसोबत काम करताना दिसले. त्यानंतर दोघांनी कधीही सोबत काम केलं नाही. ( Photos: Social Media)
Photos : ब्रेकअपनंतरही ‘या’ १२ कलाकारांनी केलं सोबत काम, पडद्यावर येऊ दिला नाही नात्यातील कडवटपणा
करीना कपूर-शाहीद कपूरपासून सलमान खान-कॅटरीना कैफपर्यंत अनेक कलाकारांनी ब्रेकअपनंतरही सोबत काम केलं.
Web Title: Know 12 actor actress of bollywood who work together even after break up with each other pbs