• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • वाचक सर्वेक्षण
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • संसदीय अधिवेशन
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. raveena tondan to madhuri dixit these 90s bollywood actresses making comeback on ottt platform kak

Photos: रवीना टंडन ते माधुरी दीक्षित…९०चा काळ गाजवलेल्या ‘या’ बॉलिवूड अभिनेत्रीही राहू शकल्या नाहीत ओटीटीपासून दूर

अनेक बॉलिवूड कलाकारांनी ओटीटीवर वेब सीरिज आणि चित्रपटांच्या माध्यमातून पदार्पण केलं.

January 29, 2022 11:44 IST
Follow Us
  • सध्या ओटीटीचा जमाना आहे. लॉकडाऊनमध्ये चित्रपटगृहे बंद असताना नेटफ्लिक्स, अ‍ॅमेझॉन प्राईम, झी या ओटीटी प्लॅटफॉर्मवरील वेब सीरिज आणि चित्रपटांनी प्रेक्षकांचं मनोरंजन केलं. ओटीटी प्लॅटफॉर्म्सपासून बॉलिवूडमधील सितारे फार काळ दूर राहू शकले नाहीत. अनेक बॉलिवूड कलाकारांनी ओटीटीवर वेब सीरिज आणि चित्रपटांच्या माध्यमातून पदार्पण केलं.
    1/14

    सध्या ओटीटीचा जमाना आहे. लॉकडाऊनमध्ये चित्रपटगृहे बंद असताना नेटफ्लिक्स, अ‍ॅमेझॉन प्राईम, झी या ओटीटी प्लॅटफॉर्मवरील वेब सीरिज आणि चित्रपटांनी प्रेक्षकांचं मनोरंजन केलं. ओटीटी प्लॅटफॉर्म्सपासून बॉलिवूडमधील सितारे फार काळ दूर राहू शकले नाहीत. अनेक बॉलिवूड कलाकारांनी ओटीटीवर वेब सीरिज आणि चित्रपटांच्या माध्यमातून पदार्पण केलं.

  • 2/14

    यात ९०च्या दशकातील अभिनेत्रीही मागे राहिल्या नाहीत. बॉलिवूडच्या धक धक गर्लपासून ते अगदी रवीना टंडनपर्यंत सगळ्यांनाच ओटीटीने भुरळ पाडली. ओटीटीवर पदार्पण केलेल्या बॉलिवूडमधील अभिनेत्रींबद्दल जाणून घेऊया.

  • 3/14

    सुष्मिता सेन – मिस युनिव्हर्स राहिलेली बॉलिवूड अभिनेत्री सुष्मिता सेनने हॉटस्टार वरील ‘आर्या’ या वेब सीरिजमधून ओटीटीवर पदार्पण केलं. या वेब सीरिजमध्ये तिने आर्या नावाचं पात्र साकारलं आहे.

  • 4/14

    आपल्या पतीच्या खूनाचा बदला घेण्यासाठी ड्रग्ज माफिया क्वीन बनलेल्या ‘आर्या’ या पात्राच्या प्रवासावर आधारित ही वेब सीरिज आहे. या वेब सीरिजचे दोन सीझन प्रदर्शित झाले आहेत.

  • 5/14

    रवीना टंडन – ‘मोहरा’, ‘अंदाज अपना अपना’, ‘अखियों से गोली मारे’, ‘के.जी.एफ चाप्टर २’ असे एक सो एक हिट चित्रपट देणारी बॉलिवूड अभिनेत्री रवीना टंडन ओटीटीपासून फार काळ दूर राहू शकली नाही.

  • 6/14

    नेटफ्लिक्सवरील ‘अरण्यक’ वेब सीरिजमधून गेल्या वर्षी तिने ओटीटीवर पदार्पण केलं. या वेब सीरिजमध्ये रवीना टंडनने पोलीस ऑफिसरची भूमिका साकारली आहे.

  • 7/14

    करिष्मा कपूर – सौंदर्य आणि अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारी अभिनेत्री म्हणजे करिष्मा कपूर. लग्नानंतर करिष्मा कपूरच्या बॉलिवूड करिअरला ब्रेक लागला होता. २०१२ साली ‘डेंजरस इष्क’ या चित्रपटातून तिने बॉलिवूडमध्ये कमबॅक केलं होतं.

  • 8/14

    २०२० साली अल्ट बालाजी या प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झालेल्या ‘मेंटलहूड’ या वेब सीरिजमधून करिष्मा कपूरने ओटीटीवर पदार्पण केलं.

  • 9/14

    काजोल – बॉलिवूड अभिनेत्री काजोल देवगणला देखील ओटीटीने भुरळ पाडली.

  • 10/14

    गेल्या वर्षी काजोलने नेटफ्लिक्सवरील ‘त्रिभंगा’ या वेब सीरिजमधून ओटीटी प्लॅटफॉर्मवर पदार्पण केलं. या वेब सीरिजमध्ये काजोल, तन्वी आझमी आणि मिथिला पालकर मुख्य भूमिकेत आहेत.

  • 11/14

    लारा दत्ता – अभिनेत्री लारा दत्ताने २०२० साली हॉटस्टारवर प्रदर्शित झालेल्या ‘हण्ड्रेड’ या वेब सीरिजमधून ओटीटीवर पदार्पण केलं. यात तिने पोलीस ऑफिसर सौम्या शुक्ला हे पात्र साकारलं आहे. लारा दत्ता आणि मराठमोळी अभिनेत्री रिंकू राजगुरू यात मुख्य भूमिकेत आहेत.

  • 12/14

    यानंतर लारा दत्ताने ‘हिकप्स अँड हुकप्स’, ‘कौन बनेगी शिखरवती’ या वेब सीरिजमध्ये देखील काम केलं आहे.

  • 13/14

    माधुरी दीक्षित – बॉलिवूडची धक धक गर्ल माधुरी दीक्षित देखील लवकरच ओटीटीवर पदार्पण करणार आहे. नेटफ्लिक्सवरील ‘द फेम गेम’ या वेब सीरिजमधून माधुरी दीक्षित प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

  • 14/14

    २५ फेब्रुवारीला ही वेब सीरिज प्रदर्शित होणार आहे. या वेब सीरिजचं नाव ‘फाईंडिंग अनामिका’ असं होतं. नंतर बदलून ते ‘द फेम गेम’ असं करण्यात आलं.

TOPICS
ओटीटी प्लॅटफॉर्मOTT PlatformबॉलिवूडBollywoodमनोरंजन बातम्याEntertainment News

Web Title: Raveena tondan to madhuri dixit these 90s bollywood actresses making comeback on ottt platform kak

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.