• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • पाऊस
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. who is saba azad the mystery girl spotted holding hrithik roshan hand after dinner in mumbai nrp

हृतिक रोशनसोबत हॉटेलबाहेर दिसलेली ‘ती’ अभिनेत्री कोण? जाणून घ्या

सध्या नेटफ्लिक्सवर रिलीज झालेल्या ‘फील्स लाइक इश्क’मध्ये झळकत आहे

Updated: January 30, 2022 20:49 IST
Follow Us
  • जबरदस्त अ‍ॅक्शन, शरीरयष्टी, आणि अफलातून डान्ससाठी ओळखला जाणारा अभिनेता ह्रतिक रोशन हल्ली बराच चर्चेत असतो.
    1/16

    जबरदस्त अ‍ॅक्शन, शरीरयष्टी, आणि अफलातून डान्ससाठी ओळखला जाणारा अभिनेता ह्रतिक रोशन हल्ली बराच चर्चेत असतो.

  • 2/16

    नुकतंच हृतिकचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यात हृतिकने एका मुलीचा हात पकडला आहे. विशेष म्हणजे ही मुलगी हृतिकच्या गाडीतून जाताना दिसत आहे.

  • 3/16

    ही मुलगी नक्की कोण? असा प्रश्न अनेकांना पडला आहे. हृतिक आणि ती मुलगी एकमेकांना डेट करतात का? असाही प्रश्न उपस्थित होत आहे. मात्र अद्याप याची कोणतीही माहिती समोर आलेली नाही.

  • 4/16

    हृतिकसोबत फिरणाऱ्या या अभिनेत्रीचे नाव सबा आझाद असे आहे. सबा आझाद ही एक बॉलिवूड अभिनेत्री आहे. तिने आतापर्यंत अनेक चित्रपटात काम केले आहे.

  • 5/16

    सबा आझादचा जन्म १ नोव्हेंबर १९९० रोजी झाला. दिल्लीत शालेय शिक्षण पूर्ण झाल्यानंतर तिने थिएटर कलाकार म्हणून सिनेसृष्टीचा प्रवास सुरु केला.

  • 6/16

    सबाने २००८ मध्ये ‘दिल कबड्डी’ या चित्रपटातून सिनेसृष्टीत पदार्पण केले. यात ती राहुल बोससोबत झळकली होती.

  • 7/16

    त्यानंतर २०११ मध्ये तिने ‘मुझसे फ्रेंडशिप करोगे’ या चित्रपटात काम केले. या चित्रपटामुळे तिला खरी ओळख मिळाली.

  • 8/16

    या चित्रपटांपूर्वी सबाने अनेक शॉर्टफिल्म्समध्ये काम केले होते. इशान नायर दिग्दर्शित ‘गुरू’ हा तिचा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात दाखल होणारा पहिला लघुपट होता.

  • 9/16

    गेल्यावर्षी प्रदर्शित झालेला ‘फील्स लाइक इश्क’ हा सबाचा शेवटचा चित्रपट होता.

  • 10/16

    सबाने २०१० मध्ये स्वतःची थिएटर कंपनी उघडली. ‘द स्किन्स’ असे त्याचे नाव होते. याद्वारे तिने ‘लव्हपुक’ नावाचे पहिले नाटकही दिग्दर्शित केले.

  • 11/16

    सबाला गायनासोबतच थिएटरचीही प्रचंड आवड आहे. त्याने अभिनेता नसरुद्दीन शाह यांचा मुलगा इमाद शाह याच्यासोबत ‘मॅडबॉय/मिंक’ या इलेक्ट्रॉनिक बँडचीही सुरुवात केली आहे.

  • 12/16

    या इलेक्ट्रॉनिक बँडद्वारे त्यांनी देशभरात परफॉर्मन्स केले. त्यानंतर २०१३ मध्ये इमादने आणि सबासोबत रिलेशनशिपमध्ये असल्याचा खुलासा केला होता.

  • 13/16

    २०१३ मध्ये यशराज फिल्म टॅलेंट डिव्हीजनने त्यांच्या युट्यूब चॅनेलवर ‘धूम अँथम’ चा एक व्हिडीओ रिलीज केला होता. यात सबा आझाद झळकली होती.

  • 14/16

    विशेष म्हणजे या राष्ट्रगीताला तिने आपला आवाज दिला. याशिवाय सबाने ‘नौटंकी साला’, ‘डिटेक्टिव ब्योमकश बक्षी’, ‘शानदार’, ‘कारवां’ आणि ‘मर्द को दर्द नहीं होता’ यांसारख्या चित्रपटांमध्येही गाणी गायली आहेत.

  • 15/16

    सबा सध्या नेटफ्लिक्सवर रिलीज झालेल्या ‘फील्स लाइक इश्क’मध्ये झळकत आहे. याआधी २०१६ मध्ये तिने ‘लेडीज रूम्स’ नावाचा वेब शोही केला होता.

  • 16/16

    लवकरच ती ‘सोनी लिव्ह’वरील आगामी वेब सीरिज ‘रॉकेट बॉईज’ मध्ये दिसणार आहे. येत्या ४ फेब्रुवारी रोजी ही वेबसीरिज रिलीज होणार आहे.

TOPICS
बॉलिवूडBollywoodमनोरंजनEntertainmentमराठी बातम्याMarathi News

Web Title: Who is saba azad the mystery girl spotted holding hrithik roshan hand after dinner in mumbai nrp

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.