• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • छगन भुजबळ
  • देवेंद्र फडणवीस
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. marathi actor shashank ketkar upcoming tv serial on star pravah muramba special interview about new role photos sdn

Photos: प्रेमाचा आंबट-गोड ‘मुरांबा’; मालिकेतील व्यक्तिरेखेबद्दल शशांक म्हणतोय…

February 9, 2022 10:12 IST
Follow Us
  • Shashank Ketkar Star Pravah Muramba
    1/12

    मराठी कलाविश्वातील ‘चॉकलेट बॉय’ म्हणून अनेक तरुणींच्या गळ्यातलं ताईत झालेला अभिनेता म्हणजे शशांक केतकर.

  • 2/12

    शशांक पुन्हा एकदा प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी सज्ज झाला आहे.

  • 3/12

    शशांक केतकर लवकरच स्टार प्रवाह वाहिनीवरील नव्या मालिकेतून आणि नव्या अंदाजात प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

  • 4/12

    या मालिकेचं नाव ‘मुरंबा’ असं आहे. या नवीन मालिकेबद्दल आणि भूमिकेबद्दल त्यांच्यासोबत साधलेला हा खास संवाद..

  • 5/12

    मुरांबा मालिकेविषयी काय सांगशिल?
    मुरांबा या शीर्षकाप्रमाणेच एक छान आंबट-गोड लव्हस्टोरी प्रेक्षकांना पाहायला मिळेल. कौटुंबिक गोष्ट आहे. नात्यांमधले ऋणानुंबध त्यातला गुंता यावर भाष्य करणारी गोष्ट आहे. जवळपास दीड वर्षांनंतर लव्हस्टोरी घेऊन भेटीला येतोय.

  • 6/12

    स्टार प्रवाह वाहिनीचे मनापासून आभार त्यांनी प्रवाह दुपारच्या माध्यमातून आता दुपारीही प्रेक्षकांसाठी मनोरंजनाचा प्रवाह सुरु केला आहे. १४ फेब्रुवारीला मालिका सुरु होतेय त्यामुळे जे प्रेमात आहेत त्यांच्यासाठी आणि ज्यांना प्रेमात पडायचं आहे त्यांच्यासाठी मुरांबा ही मालिका छान गिफ्ट असेल.

  • 7/12

    मालिकेतल्या तुझ्या लुकविषयी काय सांगशिल?
    मी आणि माझी बायको प्रियांका नुकतेच आई-बाबा झालो. आई-बाबा झालो असलो तरी पूर्वीसारखंच फिट रहायचं आहे. वेटलॉस नाही मात्र फॅटलॉस केला आहे. त्यामुळे नव्या रुपात आणि नव्या भूमिकेत प्रेक्षकांना भेटणार आहे.

  • 8/12

    रोमॅण्टिक भूमिकेत पुन्हा दिसणार आहेस त्याविषयी…
    मी बऱ्याच दिवसांपासून रोमॅण्टिक भूमिकेची वाट पहात होतो. भुमिकेच्या बाबतीत तुम्ही कितीही वेगळा प्रयोग करायला गेलात तरी लव्हस्टोरीची गोष्टच वेगळी आहे. प्रेक्षकांना लव्हस्टोरी आपलीशी वाटते.

  • 9/12

    मालिकेच्या नावाप्रमाणेच एक आंबट-गोड लव्हस्टोरी आहे. मुरांबा ज्याप्रमाणे मुरला की त्याची चव वाढते अगदी त्याचप्रमाणे मालिकेत नाती मुरताना तुम्ही अनुभवाल. स्टार प्रवाहवसोबत जवळपास ८ वर्षांनंतर काम करतोय. स्टार प्रवाह नंबर वन वाहिनी आहे. त्यामुळे या वाहिनीसोबत पुन्हा एकदा काम करताना खूप मजा येतेय.

  • 10/12

    मुरांबा मालिकेतील तुझ्या व्यक्तिरेखेचं वेगळेपण काय आहे?
    अक्षय मुकादम असं व्यक्तिरेखेचं नाव आहे. आईवर जीवापाड प्रेम करणारा आणि आजीच्या धाकाखाली वाढलेला असा हा अक्षय. अक्षयला नाती जपायला आवडतात.

  • 11/12

    शशांक आणि अक्षय या दोघांमधलं साम्य असं ती म्हणजे खवय्येगिरी. स्वयंपाक घरात नवनवे प्रयोग करायला मला आवडतात. मालिकेत देखिल माझं स्वयंपाक घराशी जवळचं नातं असणार आहे.

  • 12/12

    मुरांबाची वेळ दुपारची आहे त्याविषयी…
    स्टार प्रवाहच्या सर्वच मालिकांना प्रेक्षकांचा भरभरुन प्रतिसाद मिळतो आहे. प्रेक्षकांच्या याच प्रेमापोटी स्टार प्रवाह वाहिनीने प्रवाह दुपार हा नवा स्लॉट सुरु केला आहे. लग्नाची बेडी आणि मुरांबा या दोन मालिका दुपारच्या वेळेत प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहेत. मुरांबाची वेळ दुपारी १.३० वाजताची आहे.

TOPICS
मनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment NewsमराठीMarathiमराठी बातम्याMarathi News

Web Title: Marathi actor shashank ketkar upcoming tv serial on star pravah muramba special interview about new role photos sdn

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.