• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • आजचा जोक
  • लोकसत्ता प्रीमियम
  • राहुल गांधी
  • देवेंद्र फडणवीस
  • नरेंद्र मोदी
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. who is sneha reddy allu arjun wife know about her avb

कोण आहे अल्लू अर्जुनची पत्नी स्नेहा रेड्डी? जाणून घ्या त्यांची लव्हस्टोरी

तिच्या घरी मागणी घालायला गेला अन्…, एखाद्या चित्रपटाच्या कथेप्रमाणे अल्लू अर्जुनची लव्हस्टोरी

Updated: February 11, 2022 11:29 IST
Follow Us
  • दाक्षिणात्य सुपरस्टार अल्लू अर्जुन गेल्या काही दिवसांपासून त्याच्या 'पुष्पा द राइज' या चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटातील त्याच्या पुष्पा या भूमिकेने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. त्याची क्रेझ केवळ टॉलिवूडमध्येच नव्हे तर बॉलिवूडमध्येदेखील पाहायला मिळते. (आणखी वाचा: तीन वर्षांनी मोठ्या असणाऱ्या नम्रताने दिला होकार अन् महेशबाबू झाला महाराष्ट्राचा जावई!)
    1/17

    दाक्षिणात्य सुपरस्टार अल्लू अर्जुन गेल्या काही दिवसांपासून त्याच्या ‘पुष्पा द राइज’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटातील त्याच्या पुष्पा या भूमिकेने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. त्याची क्रेझ केवळ टॉलिवूडमध्येच नव्हे तर बॉलिवूडमध्येदेखील पाहायला मिळते. (आणखी वाचा: तीन वर्षांनी मोठ्या असणाऱ्या नम्रताने दिला होकार अन् महेशबाबू झाला महाराष्ट्राचा जावई!)

  • 2/17

    विशेष म्हणजे तरुणींमध्ये त्याची कमालीची क्रेझ आहे. मात्र अनेक तरुणींच्या मनावर राज्य करणारा हा अभिनेता मात्र एका लग्नात एका मुलीच्या प्रेमात पडला आणि तिच्याशीच त्याने लग्नगाठ बांधली.

  • 3/17

    अल्लू अर्जुनची लव्हस्टोरी फार कमी जणांना माहित असेल.

  • 4/17

    तसेच अल्लू अर्जुनची पत्नी स्नेहा ही कोण आहे? असाही प्रश्न अनेकांना पडतो.

  • 5/17

    एका मित्राच्या लग्नात अल्लू अर्जुन आणि स्नेहाची पहिली भेट झाली. खरंतर पहिल्या भेटीतच हे दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले होते.

  • 6/17

    अल्लूने जेव्हा पहिल्यांदा स्नेहाला पाहिले तेव्हा तिने त्याच्याकडे पाहून स्मित हास्य केले. तिचे हे हास्य पाहूनच तो त्याक्षणी तिच्या प्रेमात पडला.

  • 7/17

    विशेष म्हणजे याच लग्नात त्यांनी एकमेकांचे फोन नंबर एकमेकांना दिला. त्यानंतर त्याचे फोनवर बोलणे सुरु झाले.

  • 8/17

    त्यावेळी स्नेहा नुकतीच अमेरिकेतून तिची मास्टर्सची डिग्री पूर्ण करुन भारतात परतली होती.

  • 9/17

    स्नेहा हैदराबादमधील एका प्रसिद्ध व्यावसायिकाची मुलगी होती. तर अल्लू अर्जुनदेखील त्यावेळी लोकप्रियतेच्या शिखरावर होता.

  • 10/17

    त्याने तेलुगु कलाविश्वात स्वत:चे स्थान निर्माण केले होते. त्यामुळे स्नेहा त्याला एक सुपरस्टार म्हणूनच ओळखत होती.

  • 11/17

    विशेष म्हणजे अल्लू आणि स्नेहाच्या नात्याला घरातल्यांचा विरोध होता.

  • 12/17

    अल्लूने त्याच्या वडिलांना अनेक मिन्नतवाऱ्या केल्यानंतर ते स्नेहाच्या घरी अल्लूसाठी लग्नाची मागणी घालायला गेले.

  • 13/17

    मात्र स्नेहाच्या वडिलांनी या लग्नास नकार दिला.

  • 14/17

    परंतू अनेक प्रयत्न, विनवण्या करुन या दोघांनीही घरातल्यांना लग्नासाठी तयार केले.

  • 15/17

    त्यानंतर ६ मार्च २०११ मध्ये या दोघांनी लग्नगाठ बांधली.

  • 16/17

    दरम्यान, अल्लू अर्जुन आणि स्नेहाला अयान आणि अरहा ही दोन मुले आहेत.

  • 17/17

    अल्लू दाक्षिणात्य कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेता असून सोशल मीडियाच्या माध्यमातून तो कायम चाहत्यांच्या संपर्कात असतो.

TOPICS
बॉलिवूडBollywoodमनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment News

Web Title: Who is sneha reddy allu arjun wife know about her avb

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.