• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • छगन भुजबळ
  • देवेंद्र फडणवीस
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. chhatrapati shivaji maharaj jayanti 2022 actors who played shivaji maharaj role on screen information photos sdn

Chhatrapati Shivaji Maharaj Jayanti 2022 : पडद्यावर ‘या’ अभिनेत्यांनी साकारली शिवरायांची भूमिका

Updated: February 19, 2022 12:18 IST
Follow Us
  • Chhatrapati Shivaji Maharaj Jayanti 2022
    1/10

    रयतेचे राजे… हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची आज जयंती…

  • 2/10

    हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याचं स्वप्न पाहिलं, रयतेच्या सुखासाठी त्यांनी जिवाचं रानं केलं. आपल्या निवडक मावळ्यांना सोबत घेऊन त्यांनी शत्रूशी दोन हात केले. एका आदर्श स्वराज्याची निर्मिती केली.

  • 3/10

    छत्रपती शिवाजी महाराज यांच्यामुळे हा महाराष्ट्र घडला, त्यांचा इतिहास जनमनात रुजवण्याचं काम शाहिरांनी, लोककलावंतांनी मोठ्या कौशल्याने केलं. कालांतरानं माध्यमं बदलत गेली, मात्र छत्रपतींबद्दलचा आदर आणि त्यांना नव्या पिढीपर्यंत पोहचवण्यासाठीचे प्रयत्न मात्र चालूच राहिले आणि या पुढेही चालू राहतील. या बदललेल्या माध्यमातून म्हणजे चित्रपटांमधून, मालिकांमधून छत्रपती शिवाजी महाराज आपल्यासमोर आले. चला तर मग, कोणकोणत्या अभिनेत्यांनी पडद्यावर शिवरायांची भूमिका साकारली, त्यावर एक नजर टाकूया..

  • 4/10

    मराठी सिनेमाच्या सुरुवातीच्या काळात, ब्लॅक अँड व्हाईटच्या जमान्यात चंद्रकांत-सूर्यकांत या जोडीतले अभिनेते सूर्यकांत मांढरे यांनी साकारलेली महाराजांची भूमिका आजही प्रेक्षकांच्या मनात घर करून आहे. सूर्यकांत यांना प्रत्यक्ष पाहिल्यावर लोक मुजरा करत असत, असं काही ज्येष्ठ लोक सांगतात. ‘स्वराज्याचा शिलेदार’, ‘पावनखिंड’, ‘धन्य ते संताजी धनाजी’ हे त्यांचे काही चित्रपट.

  • 5/10

    २००९ सालच्या ‘मी शिवाजीराजे भोसले बोलतोय’ या चित्रपटात अभिनेते दिग्दर्शक महेश मांजरेकर यांनी छत्रपती शिवरायांची भूमिका साकारली होती. हा चित्रपट, त्यातली गाणी आजही लोकांच्या मनावर राज्य करत आहेत.

  • 6/10

    ऐतिहासिक भूमिकांचं आव्हान लीलया पेलणाऱ्या अमोल कोल्हे यांनी साकारलेले छत्रपती शिवाजी महाराज प्रेक्षकांच्या अगदी मनात उतरले. चित्रपट, नाटके, मराठी- हिंदी मालिकांमध्येही त्यांनी छत्रपतींची भूमिका साकारली आहे.

  • 7/10

    ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ या छत्रपती संभाजी महाराजांच्या आयुष्यावर आधारित असलेल्या मालिकेत शंतनू मोघे याने छत्रपती शिवरायांची भूमिका साकारली होती.

  • 8/10

    अभिनेता शरद केळकरने ‘तान्हाजी’ या हिंदी चित्रपटात छत्रपतींची भूमिका साकारली होती. वीर तानाजी मालुसरे यांच्या आयुष्यावरचा हा चित्रपट सुपरहिट ठरला होता.

  • 9/10

    अभिनेता, लेखक चिन्मय मांडलेकरने ‘फत्तेशिकस्त’ या चित्रपटात शिवाजी महाराजांची भूमिका साकारली आहे. महाराजांनी पार पाडलेल्या गनिमी काव्याच्या एका थरारक मोहिमेवर हा चित्रपट आधारित आहे.

  • 10/10

    अभिनेता गश्मीर महाजनी लवकरच शिवाजी महाराजांच्या भूमिकेत प्रेक्षकांना दिसणार आहे. ‘सरसेनापती हंबीरराव’ या चित्रपटात तो ही भूमिका साकारत आहे. आजच त्याचा फर्स्ट लुक प्रदर्शित करण्यात आला आहे.

TOPICS
मनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment NewsमराठीMarathiमराठी बातम्याMarathi News

Web Title: Chhatrapati shivaji maharaj jayanti 2022 actors who played shivaji maharaj role on screen information photos sdn

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.