-
युरोप आणि रशियामध्ये निर्माण झालेल्या युद्धजन्य परिस्थितीची सर्वत्र चर्चा आहे. संपूर्ण जगाचं लक्ष युरोप आणि रशियाकडे लागून राहिले आहे.
-
याचनिमित्ताने जाणून घेऊया हिंदी चित्रपट आणि वेब सीरिजमध्ये काम केलेल्या युक्रेनियन अभिनेत्री नतालिया कोझीनोवाबद्दल.
-
अभिनेत्री नतालिया कोझीनोवा मूळची युक्रेनची असून तिच्याकडे युक्रेनचं नागरिकत्व आहे.
-
नतालियाने अनेक बॉलिवूड चित्रपटांत काम केलं आहे.
-
२०१० साली प्रदर्शित झालेल्या ‘अतिथी तुम कब जाओगे’ या चित्रपटातून तिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं.
-
अजय देवगण आणि काजोलची मुख्य भूमिका असलेल्या या चित्रपटात नतालिया पाहुणी कलाकार म्हणून दिसली होती.
-
नतालिया ‘अंजुना बीच’, ‘लव्ह वर्सेस गँगस्टर’, ‘तेरे जिस्म से जान तक’ या चित्रपटांत मुख्य भूमिकेत होती.
-
याशिवाय ‘सुपर मॉडेल’, ‘बोले इंडिया जय भीम’ या हिंदी चित्रपटांतही तिने काम केलं आहे.
-
अल्ट बालाजीवरील ‘गंदी बात’ या वेब सीरिजच्या चौथ्या सीझनमध्ये नतालिया बोल्ड सीन देताना दिसली होती.
-
‘गंदी बात’ या वेब सीरीजमुळे ती प्रसिद्धीझोतात आली.
-
नतालिया टॅटूप्रेमी आहे.
-
तिने शरिरावरील अनेक भागांवर टॅटू काढले आहेत.
-
नटालियाच्या हातावर डॉल्फिनचा टॅटू आहे.
-
२०१५ साली पंतप्रधान मोदी आणि अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष ओबामा यांचा टॅटू पाठीवर काढल्यामुळे नतालिया चर्चेचा विषय बनली होती.
-
भारत-अमेरिकेमधील संबंध सुधारत असल्याचा आनंद तिने या टॅटूद्वारे व्यक्त केला होता.
-
लवकरच नतालिया ‘द बॅटल ऑफ भीमा कोरेगाव’ या बॉलिवूड चित्रपटात झळकणार आहे.
-
या चित्रपटात अभिनेता अर्जुन रामपालसोबत ती स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे.
-
नतालियाने चित्रपटांसोबतच हिंदी आणि पंजाबी गाण्यांच्या अल्बममध्ये सुद्धा काम केलं आहे.
-
नतालियाचा ‘भानुमती’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
-
यात ती ‘भानुमती’ हे मुख्य पात्र साकारताना दिसेल.
-
(सर्व फोटो : नतालिया कोझीनोवा/ इन्स्टाग्राम)
Photos : बॉलिवूड चित्रपट आणि वेब सीरिजमध्ये काम करणाऱ्या ‘या’ युक्रेनियन अभिनेत्रीबद्दल माहितेय का?
नतालिया कोझीनोवा ‘द बॅटल ऑफ भीमा कोरेगाव’ या बॉलिवूड चित्रपटात अभिनेता अर्जुन रामपालसोबत स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे.
Web Title: Ukrain crisi ukrainian actress nataliya kozhenova has feautured in bollywood movies and in web series gandi baat season 4 kak