• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • मनोज जरांगे पाटील
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. marathi actress ruchi savarn is a wife of actor ankit mohan who played shrimant rayajirao bandal in movie pawankhind kak

Photos : ‘पावनखिंड’ चित्रपटात रायाजीची भूमिका साकारणाऱ्या अंकित मोहनची पत्नी आहे ‘ही’ मराठी अभिनेत्री

अभिनेता अंकित मोहन याने या चित्रपटात पिळदार शरीरयष्टी असणाऱ्या श्रीमंत रायाजीराव बांदल यांची भूमिका साकारली आहे.

February 26, 2022 12:02 IST
Follow Us
  • pavankhind
    1/24

    दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांच्या ‘श्री शिवराजअष्टक’ सीरिजमधील ‘पावनखिंड’ हा चित्रपट १८ फेब्रुवारी रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित झाला.

  • 2/24

    ‘पावनखिंड’ या चित्रपटाला प्रेक्षकांकडून भरभरून प्रेम मिळत आहे.

  • 3/24

    मृणाल कुलकर्णी, प्राजक्ता माळी, चिन्मय मांडलेकर, अंकित मोहन, क्षिती जोग, अजय पूरकर, समीर धर्माधिकारी, शिवराज वायचळ यांसारख्या मातब्बर कलाकारांनी ‘पावनखिंड’मध्ये भूमिका साकारल्या आहेत.

  • 4/24

    शूरवीर बाजीप्रभू देशपांडे यांच्या बलिदानावर आधारित शिवचरित्रातील सुवर्णपान असलेल्या पावनखिंडीची गाथा सांगणारा हा चित्रपट आहे.

  • 5/24

    या चित्रपटातील कलाकारांचे कौतुक होताना दिसत आहे.

  • 6/24

    अभिनेता अंकित मोहन याने या चित्रपटात पिळदार शरीरयष्टी असणाऱ्या श्रीमंत रायाजीराव बांदल यांची भूमिका साकारली आहे.

  • 7/24

    बाजीप्रभू देशपांडे यांच्या सोबत रायाजी बांदल यांनी देखील पावनखिंडीत प्राणांची आहुती दिली होती.

  • 8/24

    कसदार अभिनयाने अंकित मोहन याने रायाजी पडद्यावर साकारले आहेत.

  • 9/24

    अभिनेत्री प्राजक्ता माळीने ‘पावनखिंड’ चित्रपटात रायाजी बांदल यांच्या पत्नी श्रीमंत भवानीबाई बांदल यांची भूमिका साकारली आहे.

  • 10/24

    अंकितची खऱ्या आयुष्यातील पत्नी देखील अभिनय क्षेत्रात असून एक उत्तम अभिनेत्री आहे.

  • 11/24

    मराठमोळी अभिनेत्री रुची सवर्ण ही अंकितची पत्नी आहे.

  • 12/24

    रुचीने ‘पावनखिंड’ चित्रपटात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पत्नी ‘सोयराबाई’ यांची भूमिका साकारली आहे.

  • 13/24

    रुची आणि अंकितने दिग्पाल लांजेकर यांच्या ‘फत्तेशिकस्त’ आणि ‘फर्जंद’ या चित्रपटात देखील भूमिका साकारल्या आहेत.

  • 14/24

    या दोन्हीही चित्रपटांत रुची सवर्ण सोयराबाईंच्या भूमिकेत दिसली.

  • 15/24

    तर अंकित मोहनने ‘फत्तेशिकस्त’ चित्रपटात येसाजी कंक यांची भूमिका साकारली होती.

  • 16/24

    अंकित ‘फर्जंद’मध्ये मुख्य भूमिकेत होता.

  • 17/24

    त्याने कोंडाजी फर्जंद यांची भूमिका साकारली होती.

  • 18/24

    रुचीने चित्रपटांसोबतच अनेक मराठी आणि हिंदी मालिकांमध्ये काम केलं आहे.

  • 19/24

    ‘कुमकुम भाग्य’, ‘कुंडली भाग्य’ या मालिकेतील रुचीच्या भूमिका लक्षवेधी ठरल्या होत्या.

  • 20/24

    तर अंकित मोहन स्टार प्लस वाहिनीवरील ‘महाभारत’ या मालिकेमुळे प्रकाशझोतात आला.

  • 21/24

    या मालिकेत त्याने ‘अश्वत्थामा’ हे पात्र साकारलं होतं.

  • 22/24

    रुची सवर्ण आणि अंकित मोहन २०१५ साली विवाहबंधनात अडकले.

  • 23/24

    नुकतंच हे दोघेही आई-बाबा झाले आहेत.

  • 24/24

    (सर्व फोटो : रुची सवर्ण , अंकित मोहन/ इन्स्टाग्राम)

TOPICS
पावनखिंडPawankhindमनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment Newsमराठी चित्रपटMarathi Movie

Web Title: Marathi actress ruchi savarn is a wife of actor ankit mohan who played shrimant rayajirao bandal in movie pawankhind kak

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.